Marathi Movie : मराठी कलाविश्वात अशी बरीच गाणी आहेत जी ऐकताक्षणी थिरकायला भाग पाडतात. आजवर अशी अनेक दमदार गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली असून आता या नव्या गाण्यांमध्ये आणखी एका धमाकेदार गाण्याची एंट्री झाली आहे. हे गाणं म्हणजेच 'बुंग बुंग बुंगाट'. सध्या सर्वत्र 'बुंग बुंग बुंगाट' या गाण्याची क्रेझ पाहायला मिळतेय. थिरकायला भाग पाडणाऱ्या या रोमँटिक आणि धमाकेदार गाण्याला गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) याने त्याच्या दमदार आवाजात गायलं आहे.
'राजाराणी' या प्रेम कथेवर आधारित असलेल्या चित्रपटातील हे 'बुंग बुंग बुंगाट' गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून ते प्रत्येकाच्या ओठावर रेंगाळताना दिसतंय. इतकंच नव्हे तर या गाण्याने साऱ्यांना थिरकायला भागही पाडले असल्याचे पाहायला मिळते. अल्पावधीतच 'बुंग बुंग बुंगाट' या गाण्यानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
'राजा राणी' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'राजा राणी' हा चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातून 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणही महत्वपूर्ण भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. इतकंच नव्हे तर रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही नवी कोरी फ्रेश जोडी ही या चित्रपटातून झळकताना दिसणार आहे. 'थोडासा भाव देना' या रोमँटिक गाण्यानंतर आता या चित्रपटातील दमदार असं 'बुंग बुंग बुंगाट' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात नायक नायिकेचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत असून त्यात खलनायकाच्या एंट्रीने ट्विस्ट आणलेला दिसतोय.
'राजा राणी' चित्रपटातील 'बुंग बुंग बुंगाट' या गाण्याच्या संगीताची धुरा पी. शंकरम यांनी सांभाळली तर पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांचे आहे. तर गाण्याचे बोल गोवर्धन दोलताडे यांचे आहेत. येत्या 18 ऑक्टोबरपासून हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येणार असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.