Chhaya Kadam : "मी कुठलाही प्राणी खाते. मी डुक्कर खाल्लाय, म्हणजे तो रानटी डुक्कर...पिसई नावाचा प्राणी जो हरणासारखा असतो तो खाल्लाय. मी घोरपड खाल्लीये. मी ससा खाल्लाय. आता सगळे ऐकतील आणि बोलतील ही बाई आहे की कोण आहे? आमच्या गावी सांगतात की, साळींदर महिलांनी खायचं नसतं. मला असं कोणी नाही म्हटलं की, ते करायला आवडतं", असं अभिनेत्री छाया कदम म्हणाली. मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलंय. 

मला आई सांगायची मासा जितका छोटा तितका खायला चांगला लागतो - छाया कदम 

छाया कदम म्हणाली, मी इंडियाच्या बाहेर गेले होते, तिथे कोणी मला सांगतिलं हा साप आहे...खा ..तर नाही... तो दुसरा डुक्कर खा...तर ते माझ्याकडून नाही होतं.. खरं सांगू खा...सुरमई, पापलेट , रावस वगैरे हे मासे सर्वांच्या आवडीचे आहेत. पण मला गावी गेल्यावर काही असे मासे आहेत, ज्यांची नावेही माहिती नसतील. हापी, काळुंद्रा ही तिकडच्या माशांची नाव आहेत..मला आई सांगायची मासा जितका छोटा तितका खायला चांगला लागतो. मासे जेवढे काटेरी असतात तेवढी त्याला चव असते, असंही छाया कदम यावेळी म्हणाली. 

अभिनेत्री छाया कदम हिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय करत वेगळी ओळख मिळवली होती. छायाने लापता लेडीजमध्येही महत्त्वाचं पात्र साकारलं होतं. लापता लेडीज हा सिनेमा संपूर्ण भारतात चर्चेत विषय ठरला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सैराट झालं जी..! जान्हवी किल्लेकरचा सैराटमधील गाण्यावर रोमँटिक अंदाज; शेअर केलं खास रील

Mahesh Manjrekar on Chhaava : 'विक्की कौशलने कधीच म्हणू नये लोक मला बघायला आले...', छावा चित्रपटावर बोलताना महेश मांजरेकर असं का म्हणाले?