Shubhangi Atre Emotional Remembering Her Late Husband: छोट्या पडद्यावर अंगूरी भाभीची (Angoori Bhabhi) भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे (Actress Shubhangi Atre) नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असते. शुभांगीनं तिच्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. पण, कितीही संकटं आली तरीसुद्धा शुभांगीनं शो मस्ट गो ऑन असं म्हणत, आपलं काम सुरूच ठेवलं. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर शुभांगीनं सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला आणि ते आव्हान पेललंही. तिनं मोठ्या धाडसानं आपल्या मुलीचा सांभाळ केला. आज शुभांगीची मुलगी 20 वर्षांची आहे. पण, घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच पतीचं निधनानं शुभांगीवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीसुद्धा शुभांगीनं कलाकार म्हणून आपलं कर्तव्य नेहमीच पार पाडलं. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना शुभांगी अत्रेनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींवर भाष्य केलंय. अभिनेत्री शुभांगी अत्रेनं नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य केलंय.
मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे काय म्हणाली?
मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणाली की, "गेली 3-4 वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल कधीच बोलत नाही. माझं फारसं मित्रमंडळीही नाही. माझ्यासाठी माझं घर आणि काम एवढंच महत्वाचं आहे... पण पतीपासून वेगळी झाले, तो काळ मी कधीच विसरु शकत नाही. तो माझ्या आयुष्यातला खूपच कठीण काळ होता. गेल्या वर्षीच पीयूषचं निधन झालं, तेव्हा मी अक्षरशः कोसळले. पण मला विश्वास आहे की, पीयूषचा आशीर्वाद माझ्यावर आणि आमची लेक आशीवर कायम आहे. मला पीयूषच्या चांगल्या आठवणी जपून ठेवायच्यात. आता मी भोपाळला घरी जाईन, तेव्हा आई-वडिलांसोबत सिनेमा पाहणार आहे. तिथे मी पीयूषसाठीही एक सीट राखून ठेवणार आहे. कारण अभिनेत्री होण्याच्या माझ्या प्रवासात पीयूषनं मला खूप पाठिंबा दिलाय.
शुभांगीनं आपल्या पतीच्या आठवणींना उजाळा देताना एक खास संकल्पही व्यक्त केलाय. ती म्हणाली, "पीयूषनं मला अभिनेत्री बनण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिलाय. त्यामुळे माझ्या बाजूला त्याची एक सीट मी नक्कीच राखून ठेवेन, हे मी स्वत:लाच दिलेलं वचन आहे..."
20 वर्षांच्या मुलीशी कसंय शुभांगीचं नातं?
शुभांगी अत्रे पुढे बोलताना आपल्या वीस वर्षांच्या मुलीसोबत असलेल्या नात्याबाबत सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की, "आज मला वाटतंय की, तरुण आई होण्याचे अनेक फायदे आहेत... मी किती लवकर आई झाली, याचा मला पूर्वी प्रश्न पडायचा, पण आता मी मातृत्वाचा पूर्ण आनंद घेतेय. काम करताना मला खूप त्रास होतो आणि कालच माझी मुलगी मला म्हणाली की, "आई, तू अजूनही लहान आहेस..." यावेळी जेव्हा ती तिच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जात होती, त्यावेळी तिला माझी चिंता वाटत होती. स्वतःची काळजी घेण्यासाठी ती मला टिप्स देत होती. खरं सांगू मुली वरदान असतात..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
