Shahnaz Gill Dating Rumours with RCB player: ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री शहनाज गिल (Shahnaz Gill) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव अभिनेता नव्हे, तर क्रिकेटपटूसोबत जोडलं जात आहे. सोशल मीडियावर सध्या देवदत्त पडिक्कल आणि शहनाज यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘बिग बॉस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबतच्या नात्यामुळे शहनाज मोठ्या चर्चेत होती. सिद्धार्थच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली होती. मात्र, आता पुन्हा तिला तिच्या आयुष्यात प्रेम सापडल्याची चर्चा रंगत आहे.
अफेअरच्या चर्चांना सुरुवात कशी झाली?
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात 13 मे रोजी सामना झाला होता. या सामन्यात शहनाज गिल स्टेडियममध्ये उपस्थित होती. RCB ला चीअर करतानाचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शहनाजने स्वतःही स्टेडियममधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती जोरात RCBचं नाव घेत टीमला सपोर्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर टीमला सपोर्ट करण्याचा उत्साह स्पष्ट दिसून येत होता.
RCB मधील 'त्या' खेळाडूसोबत जोडलं जातंय नाव
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर शहनाजचं नाव RCB चा स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कल याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.
शहनाजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण तिचं नाव देवदत्तसोबत जोडताना दिसत आहेत, तर अनेक चाहते तिच्या समर्थनार्थही उभे राहिले आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, “एखादा सेलिब्रिटी सामना पाहायला गेला की लगेच त्याचं नाव खेळाडूसोबत जोडणं चुकीचं आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “शहनाज RCB ची फॅन असू शकते. याचा अर्थ ती देवदत्त पडिक्कलला डेट करते, असा होत नाही.” दरम्यान, डेटिंगच्या या चर्चांवर अद्यापशेहेनाझ गिल किंवादेवदत्त पडिक्कल यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
