Ravi Tondon : अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tondon) वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन (Ravi Tondon) यांचे आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. अभिनेत्री रवीना टंडन हिने पोस्ट लिहित ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे.



रवी टंडन यांच्या मृत्यूची पुष्टी करताना, एका विश्वसनीय सूत्राने एबीपी न्यूजला सांगितले की, ‘86 वर्षीय रवी टंडन यांना चालता येत होते, परंतु मागील काही काळापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता. फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. या आजारामुळे त्यांनी आज पहाटे 3.30 वाजता मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.’


आज (11 फेब्रुवारी) सायंकाळी 4.30 वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत रवी टंडन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


रवी टंडन यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘खेल खेल में’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’, ‘चोर हो तो ऐसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिग्दर्शन कारकीर्दीची सुरूवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. 1960 मध्ये रिलीज झालेल्या 'लव्ह इन शिमला' या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha