Priyanka Chopra Golden Temple seva viral video: देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या परिवारासह परदेशात जरी स्थायी असली तरी, तिची भारताशी आणि भारतीय संस्कृतीशी नाळ (Indian Culture) अजूनही जोडलेली आहे.  ती आपल्या कल्चरला नेहमी फॉलो करते. तसेच विविध सणही साजरे करते. अलिकडेच प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अभिनेत्री अमृतसरला आहे. अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला (Golden Temple) अभिनेत्रीनं भेट दिली. तसेच सेवा केली.  इतर भक्तांसोबत बसून तिने भांडी घासली.  याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  प्रियांका नेमकं शुटिंगसाठी अमृतसरला गेली आहे की भेट देण्यासाठी, हे अद्याप  समोर आलेलं नाही.  दरम्यान, अभिनेत्री गोल्डन टेम्पलमध्ये सेवा करत असल्यामुळे तिचं विशेष कौतुक करण्यात येत आहे.  

Continues below advertisement

व्हिडीओत आपण पाहू शकतो की,   प्रियांकाने खास क्रिम कलरचा ड्रेस घातला आहे.  तसेच डोक्यावर ओढणी घेऊन ती भांडी घासत आहे.  माहितीनुसार, प्रियांका चोप्रा आधी गोल्डन टेम्पल पोहोचली. तिथे तिने आशीर्वाद घेतला.   तसेच ती लंगर हॉलवर गेली.  यावेळी ती भांडी घासताना दिसली.  प्रियांका तिथे बराच वेळ उपस्थित होती.  यापूर्वी तिने गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर नतमस्तक होऊन नमस्कार केला. याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   

यावेळी प्रियांकाने माध्यमांशी संवाद साधलेला नाही. दर्शन तसेच सेवा केल्यानंतर अभिनेत्री थेट निघून गेली.  प्रियांकाची ही कृती पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं.  या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने, 'ती आपली संस्कृती अजूनही विसरलेली नाही', अशी कमेंट केली आहे.  तर, काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.  'प्रियांका आपल्या आगामी चित्रपटासाठी या सगळ्या गोष्टी करत आहे', असं एका युझरने म्हटलं.  तर काहींनी,  प्रियांका कॅमेरा घेऊन  गुरुद्वारमध्ये गेली. तसेच तिने केलेल्या सेवेचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन व्हायरल केले, असं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

काही दिवसांपासून प्रियांका अमृतसरमध्ये असल्याची माहिती

 

प्रियांकाने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता.  या फोटोमध्ये आपण पाहिलं असेल ती, पंजाबी जेवणाचा आस्वाद घेत आहे. यापूर्वी ती अमृतसर एअरपोर्टमध्ये स्पॉट झाली.  तिनं आपल्या फॅन्ससोबत फोटोशूटही केले.  तिच्या आगामी चित्रपटाबाबत  सांगायचं झाल्यास, अभिनेत्री लवकरच एसएस राजामौली यांचा चित्रपट वाराणसीमध्ये  झळकणार आहे.  हा चित्रपट 7 एप्रिल 2027 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.