Malaika Arora Apartment On Lease: पन्नाशी ओलांडलेली मलायका अरोरा (Malaika Arora) आजही भल्याभल्या तरुण अभिनेत्रींना (Bollywood Actress) टक्कर देते. लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री सध्या सतत मिस्ट्री मॅनसोबत दिसतेय, त्यामुळे तिच्या नव्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, त्यासोबतच आणखी एका गोष्टीमुळे मलायका अरोरा चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीनं आपलं मुंबईतलं (Mumbai News) अपार्टमेंट भाड्यानं दिलंय. मलायकानं हा करार थेट 3 वर्षांसाठी केलाय.
मलायकानं भाड्यानं दिलं आपार्टमेंट (Malaika Gave Apartment On Lease)
Square Yards नं दिलेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सप्रमाणे या अपार्टमेंटचं एकूण भाडं 1.17 कोटी रुपये आहे. मलायकाचं हे आलिशान अपार्टमेंट वांद्रे वेस्टमधील कार्टर रोडजवळ 'विदा' नावाच्या इमारतीत आहे. तिनं हे अपार्टमेंट सुरुवातीला दरमहा 3.10 लाख रुपयांच्या भाड्यानं दिलंय. दरवर्षी भाड्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. दुसऱ्या वर्षी हे भाडं 3.25 लाख रुपये दरमहा असेल, तर तिसऱ्या वर्षी मलायकाला भाड्याचे 3.41 लाख रुपये दरमहा मिळतील.
ही डील 18 मार्च 2026 रोजी रजिस्टर करण्यात आलेली. यासाठी 30,819 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 1,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्ज भरलाय. कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट अदिती रावला भाड्यानं देण्यात आलंय. तिनंही 20 लाख रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट जमा केलंय.
सारा अली खाननं बंगला भाड्यानं दिला (Sara Ali Khan Gave Bungalow On Lease)
बॉलिवूडची स्टार अभिनेत्री सारा अली खाननं देखील 5 वर्षांसाठी एक बंगला भाड्यानं दिलाय. या डीलची एकूण किंमत सुमारे 4.14 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. यासाठी दरमहा 6.5 लाख रुपये भाडं निश्चित करण्यात आलंय.
दरम्यान, मलायका अरोरा जेवढी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते, त्याहून कितीतरी पटींनी जास्त ती तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. मलायका सध्या सतत एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट होतेय. मलायकासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन हिरे व्यापारी हर्ष मेहता असल्याचं बोललं जातंय. नुकतीच ती राजस्थानमधील आदिनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी गेलेली. तिथले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ती तिथे हर्ष मेहतासोबत दिसलेली, त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चांना उधाण आलंय. मात्र, या नात्याबाबत दोघांनीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, यापूर्वी मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंती दिलेली. मात्र, दोघांचाही ब्रेकअप झालाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
