Actress Priya Marathe death : मराठी सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालंय. गेल्या काही वर्षात प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती. दरम्यान, रविवार पहाटे तिची झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठे हिच्या जाण्याने सिनेक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय वयाच्या 38 वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या प्रिया मराठेची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. प्रिया मराठे हिने 11 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या नवऱ्यासोबतचे जयपूर ट्रीपचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करताना तिने "Awed by the hugeness and its intricacies", असं कॅप्शन दिलं होतं. (Actress Priya Marathe death )
अभिनेत्री प्रिया मराठेची डोळे दिपवणारी कारकीर्द
अभिनेत्री प्रिया मराठे यांनी 'या सुखांनो या', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथं मी', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'येऊ कशी कशी मी नांदायला' यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. मराठी मनोरंजनविश्वात त्या शेवटच्या वेळेस 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसल्या होत्या. याशिवाय 'पवित्रा रिश्ता', 'उतरन', 'कसम से', 'बड़े अच्छे लगते है' अशा हिंदी मालिकांमधूनही त्यांनी ठसा उमटवला आहे. (Actress Priya Marathe death )
प्रिया मराठे यांनी आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांतून काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'या सुखांनो या' या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर 'तू तिथं मी', 'चार दिवस सासूचे', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण', 'येऊ कशी कशी मी नांदायला' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी मालिकांमध्ये 'पवित्र रिश्ता' ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती, ज्यात त्यांनी वर्षा हे पात्र साकारले होते. (Actress Priya Marathe death )
इतर महत्त्वाच्या बातम्या