Nisha Parulekar Defeats Thackeray Sena Candidate: आज 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सध्या संपूर्ण राज्याचं मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष आहे. कुठे महायुतीने उसंडी मारली. तर, कुठे महाआघाडीने आपली घौडदौड करत विजयाचा मान मिळवला. दरम्यान, प्रभाग क्रमांक 25मध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. अभिनेत्री निशा परूळेकर हे भाजपकडून विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरेसेनेचे उमेदवार योगेश भोईर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. भाजपकडून जिंकून अभिनेत्रीनं राजकीय वर्तुळात जोरदार एन्ट्री केली आहे. प्रभाग क्रमांक 25मध्ये अभिनेत्रीनं विजयाचा गुलाल उधळल्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री
निशा परुळेकर. हे नाव मराठी सिनेसृष्टीतील तसं चर्चेत असणारं नाव. अभिनेत्रीनं मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, अभिनेत्रीनं थेट रंगमंचावरून राजकीय मैदानात उडी घेतल्यामुळे सर्वत्र याची चर्चा झाली. भाजपमधून अभिनेत्रीला तिकिट मिळालं. निशा परुळेकर यांनी प्रभाग क्रमांक 25 कांदिवली/ ठाकूर व्हिलेज परिसरातून निवडणूक लढवली. दरम्यान, अभिनेत्रीला उमेदवारी मिळाल्यामुळे महायुतीत काही प्रमाणात नाराजीचे सूर उमटले होते. मात्र, निशा परुळेकर मागे हटल्या नाहीत.
निशा परूळेंकडून ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव
निशा परुळेकर यांना कांदिवलीत भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यांना उमेदवारी मिळताच त्यांनी घराघरात जाऊन भाजप पक्षाचा प्रचार केला. तसेच सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ठाकरेंच्या उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव केला. योगेश भोईर हे शिवसेना ठाकरे सेनेचे अनुभवी चेहऱ्यांपैकी एक. पण त्यांचा या महानगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला. मतदारांनी निशा परुळेकर यांना स्पष्ट कौल देत त्यांना विजयी केलं.
निशा परुळेकर यांचे पूर्वीपासून राजकीय संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, निशा परुळेकर यांचे पूर्वीपासून राजकीय संबंध असल्याची माहिती आहे. त्या भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्ता म्हणूनही ओळखल्या जात होते. या कारणामुळेही निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25मधून उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे.
निशा परुळेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी आणि जनतेसाठी केलेले कार्य समाजमाध्यमांमध्ये शेअर करत असतात. दरम्यान, जनतेसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना सामान्यांनी निवडुन आणलं असं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: