Mahadev Jankar :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) महादेव जानकरांच्या (Mahadev Jankar) रासप पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये वर्सोव्याच्या मतदारसंघासाठी जानकरांकडून अभिनेत्री मेहक चौधरीला (Mahak Choudhary) तिकीट देण्यात आलं आहे. मेहकने काहीच दिवसांपूर्वी जानकरांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता जानकरांनी मेहकला विधानसभेसाठी देखील तिकीट दिलं आहे. 


मूळची उत्तर प्रदेशची असलेल्या महेकने दाक्षिणात्य सिनेमातून तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. महेकने 2015 मध्ये महेकने तिचा पहिला सिनेमा केला जो दाक्षिणात्य होता. त्यानंतर महेकने बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेतली. महेकची अनेक गाणी ही सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असतात. तसेच सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. महेक ही अनेक काळापासून समाजिक कामांमध्ये व्यस्त होती. त्यामुळेच तिने आता जानकरांच्या पक्षात प्रवेश करत राजकीय प्रवासाला देखील सुरुवात केली आहे.


महादेव जानकरांकडून 65 उमेदवारांची जाहीर


महादेव जानकरांच्या (Mahadev Jankar) राष्ट्रीय समाज पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी (Rashtriya Samaj Party) जाहीर केली आहे. या यादीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधून पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधून माजी आमदार बब्रूवान खंदाडे यांना तिकीट देण्यात आले आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात संदीप चोपडेंना तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांच्या विरोधात  विकास मासाळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जागांचा यादीत समावेश आहे.महादेव जानकरांचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरला असून उर्वरित उमेदवारांची यादी आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.                                                                                               






ही बातमी वाचा : 


Dhananjay Powar : पॅडी दादासाठी खास कोल्हापुरी बेत, पण जेवणानंतर स्वत:चं ताट उचलून ठेवताच धनंजयची आई म्हणाली...