Amitabh Bachchan Duplex Flat : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची गणना बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहेत. काही काळापूर्वी त्यांनी बँकेला एक मालमत्ता दिली होती, ज्याबद्दल ते खूप चर्चेत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांना या मालमत्तेमधून लाखो रुपयाचे भाडे मिळत होते. आता एक नवीन बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Senon) बिग बींची भाडेकरू बनली आहे. अमिताभ बच्चन यांनी अंधेरी परिसरात डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी दोन वर्षांचा करारही केला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, क्रिती सेननने कडक सुरक्षा व्यवस्थेसाठीही पैसे दिले आहेत. इतकेच नाही तर कृती दर महिन्याला लाखो रुपयांचे भाडे भरणार आहे. 2020 मध्ये, अमिताभ बच्चन यांनी एक मालमत्ता खरेदी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी 31 कोटी रुपयांना डुप्लेक्स आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. हा डुप्लेक्स फ्लॅट मुंबईतील अंधेरी भागात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्या या फ्लॅटसाठी अभिनेत्री क्रिती सेनन दर महिन्याला 10 लाख रुपये देणार आहे.



त्याचबरोबर क्रिती सेननने 60 लाख रुपये सुरक्षा (Security) म्हणून दिले असून याबाबतचा करारही झाला आहे. कृती सेनन हिने दोन वर्षांसाठी बिगबींचे घर भाड्याने घेतले आहे. सप्टेंबर महिन्यात अमिताभ बच्चन यांनी जुहूची मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाला भाड्याने दिली होती. बँकेने यासाठी त्यांना 12 महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स दिला आहे, जो कोट्यवधींमध्ये सांगितला जात आहे.



इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha