Kashmera Shah One Night Stand With Krushna Abhishek: बॉलीवूड (Bollywood) असो किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्री (Television Industry), आधी प्रेमात पडणं आणि नंतर लग्न करणं ही सामान्य गोष्ट आहे. पण, असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांची प्रेमकहाणी 'वन नाईट स्टँड'नं (One Night Stand) सुरू झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं. ग्लॅमरस जगातली एक अभिनेत्री (Actress) जिनं तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत 'वन नाईट स्टँड' केला आणि नंतर त्याच्याशीच लग्न केलं. ही भन्नाट लव्ह स्टोरी (Love Story) आहे, अभिनेत्री कश्मिरा शाह (Actress Kashmera Shah) आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांची. 

बॉलीवूड अभिनेता गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगनं लोकांची मनं जिंकतो. लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये सपनाची भूमिका साकारून कृष्णा अभिषेकनं खूप लोकप्रियता मिळवली. रिल लाईफमध्ये कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवणारा कृष्णा अभिषेक खऱ्या आयुष्यात मात्र, कश्मिराच्या तालावर नाचतो. कृष्णा आणि कश्मिरा नेहमी एकत्र दिसतात. दोघांची लव्ह स्टोरीसुद्धा तेवढीच भन्नाट आहे. एका मुलाखतीदरम्यान कश्मीरानं कृष्णासोबतच्या तिच्या नात्याचं सत्य उघड करून खळबळ उडवून दिली होती. त्या वेळी कश्मिरानं सांगितलं की, आम्ही वन नाईट स्टँड केलं आणि त्यानंतर लग्न. 

पहिल्यांदा भेटले, एकत्र जेवले आणि मग वन नाईट स्टँड... 

कश्मिरानं एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, जेव्हा ती पहिल्यांदा कृष्णाला भेटली, तेव्हा तिला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तिला फक्त एवढंच माहीत होतं की, तो सुपरस्टार गोविंदाचा भाचा आहे. या काळात कश्मिरानं तिच्या पतीला घटस्फोट दिला होता आणि ती एकटी राहत होती. त्याचवेळी, कृष्णानं तिच्या आयुष्यात प्रवेश केला.

कश्मिरानं सांगितलेलं की, दोघेही 'पप्पू पास हो गया' या चित्रपटाचं शूटिंग करत होते. एक दिवस कश्मिरानं कृष्णाला तिच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आमंत्रित केलं आणि ते जेवत असताना रात्रीचे 2 वाजले होते. त्याच रात्री दोघांनीही 'वन नाईट स्टँड' केला आणि कायमचे एकमेकांचे झाले. बराच काळ डेटिंग केल्यानंतर, कश्मिरा आणि कृष्णानं 2013 मध्ये लग्न केलं.

कश्मिरानं हॉलिवूड निर्मात्यासोबत बांधलेली लग्नगाठ

2017 मध्ये कश्मीरा आणि कृष्णा सरोगसीद्वारे पालक झाले. दोघांनाही जुळी मुलं झाली. कृष्णापूर्वी, कश्मीरानं 2002 मध्ये हॉलिवूड निर्माता ब्रॅड लिस्टरमनशी लग्न केलेलं. 5 वर्षांच्या लग्नानंतर 2007 मध्ये हे जोडपं वेगळं झालं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor: खिशात नेहमी कंडोम, 12व्या वर्षीच गमावली वर्जिनिटी अन् कित्येक वन नाईट स्टँड्स; बॉलिवूड सुपरस्टारचा खळबळजनक कबुलीनामा