मुंबई : बॉलिवुडची दुनिया ही मोठी आकर्षक आहे. बॉलिवडूमध्ये पैसा आहे, प्रसिद्धी आहे. सिनेसृष्टीत काम करणारऱ्या कलाकारांची नेहमीच चर्चा होते. त्यांचे राहणीमान, त्यांचे चित्रपट, त्यांच्या पार्ट्यांचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. याच बॉलिवूड जगतात प्रेम, ब्रेकअप, घटस्फोट यांचीही नेहमीच चर्चा होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहर आहेत, ज्यांनी प्रेमात पडल्यानंतर लग्न केलं. त्यानंतर मात्र संसारात अडचणी येत असल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचाही निर्णय घेतलेला आहे. आदिती गोवित्रीकर या नावाचाही यात समावेश आहे.
कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंगच्या ऑफर्स
आदिती गोवित्रीकर ही अभिनेत्री मूळची मुंबईची आहे. तिला सुरुवातीपासूनच एक डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी तिने मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता. आदितीला एक नामांकित डॉक्टर व्हायचं होतं. त्या दिशेने तिचे प्रयत्नही चालू होते. मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं. आदिती गोवित्रीकर दिसायला सुंदर असल्यामुळे तिला मॉडेलिंगच्या काही ऑफर्स आल्या. या ऑफर्सना एक साईड बिझनेस म्हणून तिने स्वीकारलं.
मुफ्फज़ल लकडावाला यांच्या पडली प्रेमात
मात्र मॉडलिंगच्या दुनियेत पुढे आदिवतीने चांगलं नाव कमवलं. 1996 साली तिने ब्यूटी क्विन हा खिताब जिंकला. त्यानंतर ती सिनेसृष्टीत सक्रिय झाली. त्यानंतर आदिवतीने 1999 साली एका तेलुगु चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. डॉक्टरेटचे शिक्षण घेत असतानाच आदिती मुफ्फज़ल लकडावाला यांच्या प्रेमात पडली होती.
लग्नासाठी धर्म बदलला
मुफ्फजल आणि आदिती हे दोघेही एकमेकांवर फार प्रेम करायचे. त्यांना लग्न करायचं होतं. मात्र या लग्नाला आदितीलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. एका मुस्लीम मुलासोबत आपल्या मुलीचे लग्न होणे, हे त्यांना मान्य नव्हतं. शेवटी 1998 साली कुटुंबाच्या विरोधात जाऊन आदिवतीने मुफ्फजल लकडावाला यांच्याशी लग्न केलं. लग्नासाठी आदितीने धर्म बदलल्याचं म्हटलं जातं. आदिती ही सारा लकडावाला बनली होती, असं सांगितलं जातं.
11 वर्षांनंतर घटस्फोट
दरम्यान, आदिती आणि मुफ्फजल यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. या दोघांमध्ये 11 वर्षांपर्यंत सर्वकाही आलबेल होते. मात्र नंतर त्यांच्यात भांडणं होऊ लागली. त्यानंतर या दोघांनीही 2008 साली घटस्फोट घेण्याचं ठरवलं. घटस्फोटानंतर मुफ्फजल ऑस्ट्रेलियात गेले तर आदिती आपल्या कियारा आणि जियान या दोन मुलांसह आपल्या आई-वडिलांच्या घरी परतली.
हेही वाचा :
Sonam Kapoor : 'फॅशनिस्टा' सोनम कपूरचा क्लासी लूक; ग्रीन ड्रेसमध्ये दिसतेय खास!
Rashmika Mandanna : 'श्रीवल्ली' ने 'पुष्पा 2' च्या सेटवरील शेअर केले BTS फोटो, एकदा पाहाचं!