Actor Sidharth Prabhu Car Accident Man Died: एकीकडे अख्खं जग नव्या वर्षांचं स्वागत करण्यात गुंतलेलं आणि दुसरीकडे मनोरंजन विश्व मात्र पुरतं हादरलंय. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ प्रभूनं (Actor Sidharth Prabhu) गाडीनं एका लॉटरीवाल्याला चिरडलंय. या भीषण अपघातात (Accident Updates) लॉटरीवाल्यानं जीव गमावलाय. या दुःखद घटनेमुळे जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असून अभिनेत्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

24 डिसेंबर रोजी केरळमधील एमसी रोडवर अभिनेत्याच्या गाडीनं एका व्यक्तीला  धडक दिली. नव्या वर्षाच्या अवघ्या काही दिवस आधीच, त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नट्टाकम कॉलेज जंक्शनजवळ लॉटरीची तिकिटं विकणारे तामिळनाडूचे रहिवासी असलेले 60 वर्षीय थंगराज यांचं गुरुवारी, 1 जानेवारी रोजी निधन झालं. ख्रिसमसच्या आदल्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते आयसीयूमध्ये दाखल होते. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सिद्धार्थ प्रभूचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि थंगराज (जखमी व्यक्ती) वाहनाखाली चिरडले गेले.

पोलिसांनी घटनास्थळावरुनच सिद्धार्थ प्रभूला अटक केली. प्राथमिक पोलीस तपास आणि ब्रेथ एनालाइज़र टेस्टमध्ये असं दिसून आलं की, अपघाताच्या वेळी तो दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त होतं.

Continues below advertisement

अभिनेत्याची पोलिसांवर अरेरावी, बाचाबाची? 

या प्रकरणी वातावरण आणखी तापलं, ज्यावेळी अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अभिनेत्यानं लॉटरीवाल्याला गाडीनं धडक दिल्यानंतर आसपास गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर तात्काळ काहीजण जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी धावले. पण, तेवढ्या गर्दी जमली. त्यावेळी अभिनेता आणि जमलेल्या गर्दीत जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ प्रभू फक्त जमलेल्या गर्दीशीच नाहीतर, पोलीस अधिकाऱ्यांशीही बाचाबाची करत होता. परिस्थिती एवढी बिकट झालेली की, पोलिसांना त्याला नियंत्रित करण्यासाठी आणि पोलिसांच्या गाडीत जबरदस्तीने बसवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?