Public Angrey On Shah Rukh Khan: बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शाहरुख खाननं असं काही केलंय की, ज्यामुळे देशभरातील लोकांचा रोष त्यानं ओढवून घेतलाय. एवढं की, त्याला गद्दार म्हणून संबोधलं जात आहे. तसेच, त्याच्या भारतातून हाकलवून देण्याचीही मागणी समोर येत आहे. त्याचं झालंय असं की, बांग्लादेशात हिंसाचार (Violence in Bangladesh) उफाळला आहे. त्यात तिथे सतत हिंदुंवर अन्याय, अत्याचार होत आहेत. अशातच बांग्लादेशींविरोधात देशात वातावरण तयार झालं आहे. त्यातच शाहरुख खाननं घेतलेल्या एका निर्णयामुळे देशात असंतोष पसरला असून शाहरुख खानविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
शाहरुख खानवर लावलेत गंभीर आरोप
मेरठच्या दौराळा भागात आयोजित अटल स्मृती संमेलनात बोलताना भाजपचे फायरब्रँड नेते संगीत सोम यांनी शाहरुख खानवर टीकास्त्र डागलं. संगीत सोम यांनी अभिनेता शाहरुख खानवर आयपीएलमध्ये बांगलादेशी क्रिकेटपटू रहमान खानला सुमारे ₹9.5 कोटींना खरेदी केल्याचा आरोप केला आणि ते देशविरोधी कृत्य असल्याचं म्हटलंय. असे लोक देशात राहण्यास लायक नाहीत, असंही ते म्हणालेत. सोम म्हणाले की, बॉलिवूड आणि क्रिकेटच्या माध्यमातून देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन दिलं जातंय.
हिंदू महासभेनं व्यक्त केला शाहरुख खानवर संताप
अभिनेता शाहरुख खाननं आपल्या आयपीएल संघासाठी बांगलादेशी खेळाडूला विकत घेण्याच्या निर्णयाविरोधात हिंदू महासभेनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शाहरुख खाननं आपल्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडूला खरेदी केल्यानं लोकांमध्ये मोठा रोष बघायला मिळतोय. हा विरोध इतका जास्त वाढला की, शाहरुख खान याला बांग्लादेशात पाठवण्याची मागणी केली जातेय. एवढंच नाहीतर, तो गद्दार असून त्याला देशाबाहेर हाकलण्याचीही मागणी होतेय.
"शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस..."
अखिल भारतीय हिंदू महासभा आग्रा जिल्हा अध्यक्षा मीरा राठोड म्हणाल्या की, "बांग्लादेशात आमच्या हिंदू बांधवांना जाळून मारण्यात आलं आणि हा माणूस तिथल्याच लोकांना विकत घेऊन इथे खेळवतोय. आज मी त्याच्या चेहऱ्यावर काळं फासलं असून बुटांनी त्याला मारलंय. जर आमच्या बांधवांच्या बाबतीत असं घडलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आमच्या बांधवांच्या बाबतीत जे घडतंय, ते चुकीचं आहे. जो कोणी शाहरुख खानची जीभ छाटेल, त्याला आम्ही ₹1,00,000 चे रोख बक्षीस देऊ...."
दिनेश फलाहारी महाराजांनी पंतप्रधानांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. ते म्हणाले की, शाहरुख खानला बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराची माहिती आहे. मात्र, त्यानंतरही त्यानं बांगलादेशी क्रिकेटपटू रहमानला लाखो रुपये देऊन विकत घेतलंय. हेच नाही तर शाहरुख खानचे संबंध बांग्लादेशातील दहशतवाद्यांसोबतही असू शकतात, असा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे. देशातील शाहरुख खानसारख्या सर्व व्यक्तींची यादी तयार करून त्यांना बांग्लादेशात पाठवलं जावं, असंही ते पत्रात म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
