R. Madhavan on Political Entry: साऊथ अन् बॉलिवूडचे सुपरस्टार आर. माधवनचा (R.Madhavan) चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेता सध्या आपल्या आगामी सिनेमा 'जीडीएन' सिनेमामुळे चर्चेत आहे. कुष्णकुमार रामकुमार दिग्दर्शित हा सिनेमा 7 ऑगस्ट रोजी सिमेमागृहात रिलीज होणार आहे. आर. माधवन सध्या या सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याची 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' (Dhurandhar)मधील भूमिकाही प्रचंड गाजली. अशातच आर. माधवन याने तामिळनाडू (Tamilnadu) राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय (Thalapthy Vijay) यांचं कौतुक केलं आहे. तसेच राजकारणात एन्ट्री करणार का? यावरही त्यांनी आपलं मत मांडलं.
'मी विजय थलपती यांना जवळून ओळखतो...' (Actor R. Madhavan praises Tamilnadu CM Thalapathy Vijay)
आर. माधवनने नुकतंच, बिहाइंटवुड्स टीव्हीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने तामिळनाडूतील राजकारणावर उघडपणे भाष्य केलं. 'सगळं काही चांगलं सुरू आहे', असं अभिनेता म्हणाला. आर. माधवनला, मित्र विजय थलापती यांच्या यशाबाबत आणि मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. आर. माधवन म्हणाला की, 'यातून माझा इतका आत्मविश्वास वाढला की, गोष्टी इतक्या लवकर बदलू शकतात, हे मला कळलं. मी थलपती विजय यांना जवळून ओळखतो'.
'पण आता विजय थलपती यांना मी सीएम विजय असं म्हणायला हवंय', असं आर. माधवन म्हणाला. अभिनेता आगामी काळात राजकीय क्षेत्रात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. आर. माधवन म्हणाला की, 'मला पॉलिटीक्समध्ये जराही रस नाही. पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी तळमळ असायला हवी. मला नाही वाटत की, ती भावना माझ्या मनात आहे'.
'मला माझ्या पद्धतीने समाजासाठी चांगलं काम करायचं आहे. पॉलिटिक्स दोधारी तलवार आहे. मला पॉलिटिक्सबाबत जास्त कळतही नाही', असं आर. माधवन म्हणाला. आर. माधवनच्या वर्कफ्रंडबाबत बोलायचं झाल्यास, अभिनेता अलिकडेच 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' मुळे चर्चेत आला होता. आता तो लवकरच 'जीडीएन'मध्ये झळकणार आहे. हा सिनेमा तामिळ भाषेसह कन्नड, मल्याळम तेलुगु आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
