Paresh Rawal on Sharad Pawar : अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं तोंड भरुन कौतुक केलंय. शरद पवारांमुळे आमचा प्रश्न अवघ्या 10 सेकंदात सुटला, असं म्हणत परेश रावल (Paresh Rawal) यांनी मराठी माणूस काय असतो हे सांगितलं आहे. नाटकांच्या वरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. मी शरद पवार (Sharad Pawar) यांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात तो प्रश्न सुटला, असं परेश रावल म्हणाले आहेत. 

परेश रावल म्हणाले, मराठी असल्याने मला वाटायचं की, शरद पवार आर्टची सेवा करतील. मी शरद पवारांना मदतीसाठी विचारलं. ते म्हणाले अरुण जेटलींचा वेळ घ्या...मी तुमच्यासोबत येतो. मी, अजित भुरेकर आणि अशोक खांडेकर पवार साहेबांकडे गेलो. त्यांना भेटलो चहा वगैरे घेतला. त्यांनी विचारलं जेटलींनी किती वाजता बोलावलं आहे. मी म्हणालो आठ वाजता बोलावलं आहे. येथून फक्त 5 मिनीटे लांब आहे. पवार साहेब म्हणाले तिकडे जाऊन बसू...मात्र, तिथं गेल्यानंतर जेटलींना समजलं की, शरद पवार आले आहेत. त्यामुळे ते लगेच आले. शरद पवार म्हणाले, थिअटरचा प्रश्न आहे. तेव्हा जेटली म्हणाले, हो मला परेशने सांगितलं होतं. ठीक आहे मी ते करतो. केवळ 10 सेकंदात प्रश्न सुटला. 

पुढे बोलताना परेश रावल म्हणाले, मी शरद पवारांना म्हणालो तुम्ही 10 सेकंदात प्रश्न सोडवला. ही तर तुमची वोट बँक देखील नाही. ते मला म्हणाले, परेश हा कला आणि संस्कृतीचा विषय आहे. ही दादागिरी आहे. हे मराठी लोक आहेत.  

मराठी रंगभूमीबद्दल परेश रावल काय काय म्हणाले होते? 

परेश रावल यांनी 'कोण होणार करोडपती' या मराठी शोमध्ये हजेरी लावली होती. त्या वेळी त्यांनी मराठी रंगभूमीबद्दल आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, "मला मराठी भाषेचा तितका सराव नाही. मी या भाषेचा खूप आदर करतो. मी काही चुकीचे बोललो तर ते पाप होईल असे मला वाटते. जर मी सराव केला तर नक्कीच मराठी नाटकात काम करू शकतो. पण चुकीचे बोलायला नको म्हणून मी यापासून थोडे लांबच असतो." ​

मराठी कलाकारांसोबत हिंदी चित्रपटात काम

परेश रावल लवकरच 'द ताज स्टोरी' या हिंदी चित्रपटात दिसणार आहेत, ज्यामध्ये मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि स्नेहा वाघ यांच्यासोबत ते काम करत आहेत. हा चित्रपट ताजमहाल आणि आग्रा परिसरातील ऐतिहासिक स्थळांवर आधारित असून, त्याचे शूटिंग डेहराडून आणि उत्तराखंडमध्ये झाले आहे. ​यापूर्वीही परेश रावल यांनी मराठी कलाकारांसोबत काम केलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ankita Walawalkar On Suraj Chavan: 'सोशल मीडियावर गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या...'; अंकिता वालावलकरनं सांगितलं 'झापुक झुपूक'ला कमी प्रतिसाद मिळण्याचं कारण