May 2025 Lucky Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून मे महिन्याला सुरुवात झाली आहे. हा मे (May 2025) महिना काही राशींसाठी फार खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठ-मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर होणार आहे. 

ग्रहांच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, 14 मे रोजी गुरु ग्रह बृहस्पती मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर, सूर्य ग्रह वृषभ राशीत असणार आहे. 18 मे रोजी राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर, 7 मे रोजी बुध ग्रह मेष राशीत आणि 23 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. 

मे महिन्यात जुळून येणाऱ्या राजयोगांमध्ये चतुर्ग्रही योग, त्रिग्रही योग त्याचबरोबर मालव्य, लक्ष्मी नारायण, आदित्य योग आणि षडाष्टक योग निर्माण होणार आहेत. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी मे महिना फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लग्न भावात गुरु ग्रह असणार आणि मिथुन राशीत त्यानंतर दुसऱ्या भावात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिलेल. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तुमच्या जीवनात आनंद दुपटीने वाढेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमची मेहनत वाया जाणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी मे महिना फार खास असणार आहे. या राशीत चतुर्ग्रही, त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचं आध्यात्मात मन रमेल. तसेच, या कालावधीत तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, तुमच्या जीवनात सुख-सांती टिकून राहील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना फार लकी असणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये चांगला आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. तसेच, तुमची शारीरिक आणि मानसिक तणापासून मुक्ती होईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी हा काळ फार चांगला ठरणार आहे. या काळात गुरु ग्रह बृहस्पतीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या सुख-समृद्धी आणि ऐश्वर्यात याचा चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे. तुमची जी काही रखडलेली कामे आहेत ती तुम्ही या कालावधीत पूर्ण करु शकता. नोकरीत प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. तसेच, नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. 

मेष रास (Aries Horoscope)

मे महिना मेष राशीसाठी फार भाग्याचा ठरणार आहे. या कालावधीत तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल त्यामुळे तुमच्यावर कोणतंच आर्थिक संकट येणार नाही. तुमची अनेक रखडलेली कामे या कालावधीत तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

 Guru Gochar 2025 : गुरु ग्रहाचा होणार बुध ग्रहात प्रवेश; 14 मे पासून 'या' राशींचं पालटणार नशीब, सुवर्णकाळ होणार सुरु