मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता ज्युनिअर एटीआरनं आरआरआर चित्रपटाद्वारे जगभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. एनटीआर जूनियर लवकरच आगामी देवरा पार्ट-1 या चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान, ज्युनियर एनटीआरला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. एनटीआरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना तब्येतीबाबत अपडेट दिली आहे.


अभिनेता एनटीआर ज्युनियर जखमी


वर्कआउट करताना अभिनेता ज्युनियर एनटीआर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्युनियर एनटीआच्या टीमने त्याच्या तब्येतीसंदर्भातील माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. टीमने यावेळी सांगितलं आहे की, खबरदारी म्हणून एनटीआरच्या हाताला प्लास्टर करण्यात आल्याची माहिती आहे.


वर्कआउट करताना हाताला दुखापत


अभिनेता एनटीआर ज्युनियर अलिकडेच जिममध्ये वर्कआऊट करताना जखमी झाला आहे. व्यायाम करत असताना त्याच्या मनगटाला किरकोळ दुखापत झाली असल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेता एनटीआरच्या टीमने बुधवारी त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.






ज्युनियर एनटीआरच्या हाताला प्लास्टर


अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं आहे की, "काही दिवसांपूर्वी जिममध्ये व्यायाम करताना एनटीआरच्या डाव्या हाताच्या मनगटावर किरकोळ दुखापत झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं आहे. दुखापत झाल्यानंतरही एनटीआरने काल रात्री देवराचं शूटिंग पूर्ण केलं," असं निवेदनात सांगण्यात आलं आहे. आता त्याची तब्येत ठीक आहे आणि काही आठवड्यांत कामावर परतेल. ही दुखापत किरकोळ असल्याने चाहत्यांनी चिंता करु नये.


देवरा चित्रपटाचं शूटिंग नुकतेच संपलं


13 ऑगस्ट ज्युनियर एनटीआरने 'देवरा : भाग 1' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ज्युनियर एनटीआरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. X मीडियावर एका पोस्टमध्ये त्याने माहिती दिली होती की, त्याने हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.






देवरा चित्रपटात हे स्टार्स झळकणार


देवरा चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतल्ला शिवा यांनी केलं आहे. देवरा पार्ट-1 चित्रपट 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत अभिनेत्री जान्हवी कपूरही झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटातील 'धीरे धीरे' हे एक गाणे प्रदर्शित झालं असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यात जान्हवी खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान देखील दिसणार आहे. सैफ अली खान या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Aishwarya Rai : अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायचं करिअर उद्ध्वस्त केलं? अनेक मोठे चित्रपट हातून हिसकावले, व्हायरल पोस्टमुळे खळबळ