Actor Govinda : अभिनेता गोविंदा (Actor Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Aahuja) यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगली होती. मात्र, गोविंदाच्या (Actor Govinda) मॅनेजरने घटस्फोटाची वृत्त फेटाळून लावलं होतं. शिवाय गोविंदा (Actor Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Aahuja) एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करताना दिसतील, असंही मॅनेजरने म्हटलं होतं. दरम्यान, बुधवारी (दि.28) मॅनेजरचे शब्द खरे ठरले. गोविंदा (Actor Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Aahuja) गणेशोत्सव एकत्रितपणे साजरा करताना दिसले. यावेळी दोघांनीही घटस्फोटांच्या चर्चेबाबत उघडपणे भाष्य केलं. 

Continues below advertisement






अभिनेता गोविंदा (Actor Govinda) म्हणाला, माझी लायकी नसताना मला भरपूर काही मिळालं आहे. आईचा (देवी) आशीर्वाद मला मिळाला. मातृ देवो भव.. तुम्ही कधीही मला कोणत्या स्त्रीचा विरोध करताना पाहाणार नाहीत. घरात आणि परिवारात देखील मी कायम प्रार्थना करतो. तुम्हाला किती मोठी स्टारडम मिळाली. तर ईश्वराने पुरुषाकडे कर्म दिलं आहे. परंंतु भाग्य जे आहे, त्याची देवी नेहमी स्त्री आहे, असं गोविंदाने (Actor Govinda) स्पष्ट केलं आहे. 


सुनीता आणि गोविंदाला (Actor Govinda) त्यांच्या दीर्घकाळापासून चालू असलेल्या घटस्फोटाच्या बातम्यांबाबत विचारले गेले, तेव्हा सुनीता लगेचच भडकल्या. इन्स्टंट बॉलिवूडच्या एका व्हिडिओमध्ये सुनीता माध्यमांना प्रत्युत्तर देताना म्हणाल्या, "तुम्ही लोक गणपतीचे दर्शन घ्यायला आलात की वादविवाद ऐकायला? काहीही वाद नाही आहे."


सुनीताने गोविंदासोबत (Actor Govinda) हजेरी लावून केवळ त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर पूर्णविराम लावला नाही, तर अशीही चर्चा होती की तिने अहान पांडेच्या अभिनयाबद्दल उपरोध केला होता. याबद्दलही सुनीताने आता स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, "मी अहान पांडेबद्दल असे काहीही चुकीचे बोललेले नाही. मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. मला हवे आहे की इंडस्ट्रीत प्रत्येक मूल प्रगती करावे, कारण माझे स्वतःचे मूल चित्रपटांमध्ये येत आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे अफवा पसरवणे थांबवा."


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Kabhi Khushi Kabhie Gham Actress Blessed With Daughter: 'कभी खुशी कभी गम'मधली छोटी 'पू' बनली आई; करिना कपूरच्या लहानपणीची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्रीला कन्यारत्न