Duranga : झी 5ने नुकतीच ‘दुरंगा’ (Duranga) या आगामी सीरिजची घोषणा केली. ही नवी सीरिज कोरियन मालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ची अधिकृत हिंदी रिमेक आहे. रोझ ऑडिओ व्हिज्युअल्सची निर्मिती असलेली ही 9 भागांची रोमँटिक थ्रिलर सीरिज असून त्यात गुलशन देवैय्याह आणि द्रष्टी धामीसह अभिजीत खांडकेकर, बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन सहाय्यक भूमिकांत झळकणार आहेत.
अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा लोकप्रिय मराठी अभिनेता ‘दुरंगा’ या सीरिजमध्ये नामांकित क्राईम रिपोर्टर विकास सोराडे व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याची व्यक्तिरेखा समित पटेलची खरी बाजू उलगडून लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्न करताना दिसेल.
काय आहे कथानक?
समित विकासच्या मिशनची माहिती समजताच आपले बराच काळ दडवून ठेवलेले सत्य लपवण्याची खटपट करताना पाहायला मिळेल. अभिजीत हा लोकप्रिय मालिका आणि सिनेमे ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘धर्मवीर’ आणि अशाच काही महत्त्वाच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘दुरंगा’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
ओटीटीवर पदार्पण करताना आनंद होतोय!
आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिजीत खांडकेकर म्हणाला की, ‘दुरंगासारख्या कार्यक्रमासोबत मी माझा ओटीटी प्रवास सुरू करतो आहे, याचा आनंद वाटतो. फ्लॉवर ऑफ इव्हीलसारख्या एखाद्या कोरियन मालिकेचा हिंदी रिमेक पहिल्यांदाच करण्यात आला. फ्लॉवर ऑफ इव्हील प्रचंड यशस्वी ठरल्याने हीच जादू दुरंगा देखील करेल, अशी मला आशा वाटते. मला माझ्या ड्रीम टीम सोबत, सहकलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह काम करण्याची संधी मिळते आहे. त्यांनी या मालिकेसाठी मला एक अभिनेता म्हणून प्रोत्साहन दिले. त्याशिवाय मी साकारत असलेले पात्र कथेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि माझ्या कामाबद्दल मी खरंच आनंदी आहे. माझ्या मराठी भूमिकांसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि माझ्या या प्रवासासाठी देखील ते मला साह्य करतील ही आशा आहे.’ झी5 वर 19 ऑगस्ट 2022पासून ‘दुरंगा’ प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :