Nikhil Rajeshirke Wife Pregnancy Announcement: 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या हे पात्र साकारणारा रोहन गुजर (Rohan Gujar) हा बाबा झाला आहे. त्याची पत्नी स्नेहल देशमुखने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ही गोड बातमी ताजी असतानाच मराठी इंडस्ट्रीतील आणखी एका कलाकाराच्या घरात पाळणा हळणार आहे. 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता निखिल राजेशर्केच्या घरात लवकरच पाळणार हळणार आहे. त्याची पत्नी गरोदर असून, त्यानं ही गोड बातमी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यानं डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करुन याची माहिती दिली. त्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
निखिल राजेशिर्के लवकरच बाबा होणार (Nikhil Rajeshirke Wife Pregnancy)
निखिल आणि चैत्रालीच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. दीड वर्षांनंतर दोघेही आई- बाबा होणार आहेत. दोघांनी फोटोशूट केलं आहे. चैत्राली बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिनं फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली असून, या सुंदर साडीवर तिनं फुलांचे दागिने घातले आहेत. चैत्रालीने हलका मेकअप कॅरी केला आहे. या लूकमध्ये चैत्राली सुंदर दिसत होती. तर, निखिलने क्रिम - सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती.
निखिल राजेशिर्के आणि त्याची पत्नी दीड वर्षांनंतर पालक होणार (Nikhil Rajeshirke and Chaitrali Baby Bump Photoshoot)
2024 साली निखिल आणि चैत्रालीने लग्न केलं होतं. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. दोघांचे हे फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल होत असून, सिनेकलाकार तसेच नेटकऱ्यांनी या गोड कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या निखिलाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
निखिल सध्या 'लक्ष्मी निवास' या मालिकेमुळे चर्चेत आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'रंग माझा वेगळा', 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यानं शेअर केलेल्या गुडन्यूजनंतर अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री
