Bollywood Action Director Shyam Kaushal: बॉलिवूडच्या (Bollywood) धडाकेबाज अभिनेत्यामध्ये समाविष्ठ होणारा अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'छावा'मुळे (Chhaava Movie) चर्चेत आहे. विक्कीनं आपल्या बॉलिवूड डेब्यूपासूनच एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्यापैकी 'मसान', 'उरी' आणि 'राझी' सारख्या चित्रपटांनी त्याला बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवून दिलं. तेव्हापासून विक्कीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण, तुम्हाला माहिती आहे का? विक्की कौशलही एक स्टारकीड आहे. पण इतर स्टारकिड्ससारखं आयुष्य त्याच्या नशीबी कधीच आलं नाही. विक्की कौशलच्या वडिलांना इंडस्ट्रीमध्ये अॅक्शन फिल्मचा सीक्रेट सुपरहिरो म्हणून ओळखलं जायचं.
विकी कौशल हा आजच्या काळातल्या प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक. कोणतीही भूमिका असली, तरी विक्की त्या भूमिकेचं सोनं करतो, असं म्हणतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर विक्की कौशलनं इंडस्ट्रीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. पण आज सुपरस्टार बनलेला विकीने बालपणात खूप संघर्ष केला आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्याचे वडील सेल्समन म्हणून काम करायचे. विक्की कौशलचे वडील श्याम कौशल (Shyam Kaushal) एकेकाळी 350 रुपये महिन्याला काम करायचे.
विक्की कौशलनं कधीकाळी त्याच्या आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना केला आहे. त्याचे वडील, प्रसिद्ध बॉलिवूड अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल यांनी इंडस्ट्रीतील जवळजवळ सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्टंट मॅन म्हणून काम सुरू केलं. विकी कौशलचे वडील आणि कतरिना कैफचे सासरे शाम कौशल यांनी संघर्षांशी झुंज देत यश मिळवलं.
संघर्षाशी दोन हात करून श्याम कौशल यांनी गाठलेलं यशाचं शिखर
श्याम कौशल यानी अपार मेहनत आणि कष्ट करुन आपला ठसा उमटवला. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत बोलतान श्याम कौशल यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाची गुपितं उघड केली होती. पुढील शिक्षणाचा खर्च भागवणं कठीण असल्याचं श्याम यांनी सांगितलं होतं, म्हणून त्यानं काम सुरू केलं. या काळात, एका मित्रानं त्यांना चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. जेव्हा शाम कौश मुंबईत आले, तेव्हा ते महिन्याला 350 रुपये पगारावर सेल्समन म्हणून काम करत होते.
अॅक्शन फिल्म्सचा 'सीक्रेट सुपरहिरो'
श्याम कौशल यांनी बोलताना पुढे म्हटलेलं की, त्यांना कधीच नोकरी करायची नव्हती. पण, त्यांच्या डोक्यावर एवढं मोठ्ठ कर्ज होतं की, ते चुकतं करण्यासाठी त्यांनी नोकरी करण्याचा विचार केला. यावेळी त्याच्यासोबत राहणाऱ्या पंजाबमधल्या लोकांनी त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंट मॅन बनण्याचा सल्ला दिला होता. श्याम कौशल यांना हा पर्याय पटला आणि त्यांनी इंडस्ट्रीत स्टंटमॅन म्हणून काम करण्याचं पक्क केलं. त्यानंतर काही काळाच्या ट्रेनिंगनंतर 1980 मध्ये त्यांनी इंडस्ट्रीत स्टंटमॅन म्हणून काम करायला सुरुवात केली.
स्टंटमॅन म्हणून काम करून त्यांनी लोकांची मनं जिंकली आणि नाना पाटेकर यांच्या 'प्रहार' चित्रपटातून अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत श्याम यांनी अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, विनोद खन्ना, अनिल कपूर, हृतिक रोशन, प्रकाश झा आणि संजय लीला भन्साळी अशा दिग्गजांसोबत काम केलं. मोठा संघर्ष करुन नाव कमावलेल्या आपल्या वडिलांप्रमाणेच विक्की कौशलही आज भल्या भल्या स्टारिड्सना मागे टाकून बॉलिवूडचा हुकुमी एक्का बनला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :