Oscar Nominations 2023 Full List: प्रतिष्ठीत 95 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठीच्या नामांकनांची घोषणा करण्यात आली असून 'ऑल दॅट ब्रेथ्स' आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' या भारतीय माहितीपटांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. तर एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यालाओरिजनल साँग्स श्रेणीत एक नामांकन मिळाले आहे.


एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स (Everything Everywhere All At Once) चित्रपट या यादीत 11 नामांकनासह आघाडीवर आहे. द बॅन्शीज ऑफ इनशेरिन आणि ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट या दोन चित्रपटांना 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये नऊ नामांकनं मिळाली आहेत. त्यानंतर एल्विसला आठ नामांकन मिळाले आहेत. स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'द फॅबेलमॅन्स'ला सात नामांकन मिळाले. टॉड फील्डच्या टार आणि जोसेफ कोसिंस्कीच्या टॉप गन मॅव्हरिक या दोन चित्रपटांना सहा नामांकन मिळाली आहेत.


Best Picture: सर्वोत्तम चित्र



  • ऑल दॅट क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रन्ट- All Quiet on the Western Front

  • अवतार- Avatar: The Way of Water

  • द बनशीज ऑफ इनशेरिन- The Banshees of Inisherin

  • एल्विस- Elvis

  • एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स- Everything Everywhere All At Once

  • फॅबेलमॅन्स- The Fabelmans

  • टार-Tár

  • टॉप गन मॅव्हरिक- Top Gun Maverick

  • ट्रॅंगल ऑफ सॅडनेस- Triangle of Sadness

  • विमन टॉकिंग- Women Talking


Best Director: सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक



  • डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनेर्ट - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स

  • टॉड फील्ड - टार

  • मार्टिन मॅकडोनाघ - द बनशीज ऑफ इनशेरिन

  • रुबेन ऑस्टलंड - ट्रॅंगल ऑफ सॅडनेस

  • स्टीव्हन स्पीलबर्ग - फॅबेलमॅन्स



Best Actor- सर्वोत्कृष्ट अभिनेता



  • ऑस्टिन बटलर - एल्विस

  • कॉलिन फॅरेल - द बनशीज ऑफ इनशेरिन

  • ब्रेंडन फ्रेझर - द व्हेल

  • पॉल मेस्कल - आफ्टरसन

  • बिल नायटी - लिव्हिंग


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री



  • केट ब्लँचेट – टार

  • अना डी आर्मास - ब्लोंड

  • अँड्रिया रिसबरो  टू- लेस्लाई

  • मिशेल विल्यम्स - द फॅबेलमॅन्स

  • मिशेल येओह - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स


एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची भुरळ अद्यापही कायम आहे. या चित्रपटातील नाटू नाटू (Natu Natu Songs) या गाण्याला ऑस्करमध्ये (Oscar Nominations 2023) ओरिजनल साँग्स या गटात (Best Score Academy Award)नामांकन मिळालं आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी आरआरआर या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. यामधील नाटू नाटू हे गाणं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या गाण्याची जादू अद्यापही कायम आहे. या गाण्यावर अनेकजण थिरकले आहेत. आता या गाण्याला ओरिजनल साँग्स या गटात ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.


 


ही बातमी वाचा: 


Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका!  नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन