Abhishek Bachchan On Aishwarya Rai Divorce: बॉलिवूडमधील लोकप्रिय असलेलं सेलिब्रेटी कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचंही बोललं जात होतं. घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक  (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या यांनी थेट भाष्य करणं टाळलं होतं. पण, ते अनेक इव्हेंटमध्ये फॅमिलीसोबत एकत्र दिसत होते. अनेक दिवसांपासून या सर्व चर्चांमुळे त्यांच्या नात्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता अखेर इतक्या दिवसांनी अभिषेक बच्चनने  (Abhishek Bachchan) घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

अभिनेता अभिषेक बच्चनने  (Abhishek Bachchan) नुकतीच 'पीपिंग मून'ला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी लग्नाबाबत आणि ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अभिषेकनेथेट उत्तर देत म्हटलं आहे की, "लग्नाच्या आधी त्यांना आमचं लग्न कधी होणार हे जाणून घ्यायचं होतं. आता ते घटस्फोटाच्या चर्चा करत आहेत. माझ्या पत्नीला माझं सत्य माहीत आहे. मला तिच्याबद्दल सर्व  माहीत आहे. आम्ही एक आनंदी आणि परिपूर्ण कुटुंब आहोत आणि आमच्यासाठी हेच महत्त्वाचं आहे", असं म्हणत अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  (Abhishek Bachchan) 

पुढे अभिषेक बच्चनने म्हटलं की, "मी खूप नम्रतेने आणि सन्मानाने हे सांगू इच्छितो की मीडिया खूप चुकीच्या गोष्टी पसरवते. मीडिया देशाचा आत्मा आहे. आजच्या जगात तुम्हाला सगळ्यात आधी न्यूज द्यायची असते. मी मिडीयावर असलेला दबाव समजू शकतो. पण, तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहात? तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोलत आहात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कुणाचा तरी नवरा, वडील असल्याच्या नात्याने मला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जर तुम्ही माझ्या कुटुंबाबाबत चुकीचं बोललात तर तुम्हाला याचा सामना करावा लागेल. कारण, माझ्या कुटुंबाबाबत काहीही चुकीचं मी सहन करणार नाही", असं म्हणत अभिषेकने पुढे एकप्रकारे इशाराच दिला आहे. अभिषेकच्या या थेट वक्तव्यानंतर आता त्याच्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. त्यानंतर ४ वर्षांनी २०११ मध्ये त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव आराध्या आहे. 

Continues below advertisement

आराध्या आपल्या आई-वडिलांबद्दलच्या अफवांबद्दल विचार करते का किंवा त्याचा तिच्यावर परिणाम होतो का, असा प्रश्न विचारल्यावर अभिषेक बच्चन उत्तर देताना म्हणाला की, तिला अशा प्रकारचा मजकूर शोधण्यात काहीही रस नाही. “मला वाटत नाही की ती असं काही करते; तिला त्यात रसही नाही. जे काही ती वाचते त्यावर त्वरित विश्वास ठेवू नये, हे तिच्या आईने तिला शिकवलं आहे. माझ्या पालकांनी मला जसं शिकवलं होतं, तसंच. आम्ही आमच्या कुटुंबासोबत नेहमी प्रामाणिक राहिलो. त्यामुळे कधी अशी वेळ आली नाही की कुणाला काही शंका विचारावी लागेल.”