Abhijit Bichukale Warns On Marathi Hindi Controversy: महाराष्ट्रात (Maharashtra News) हिंदी सक्तीबाबत (Marathi Hindi Language Controversy) राज्य सरकारनं (Maharashtra Government) काढलेल्या जीआरनंतर मातृभाषा मराठीचा (Marathi Language) मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर हिंदी सक्तीला झालेल्या कडाडून विरोधानंतर राज्य सरकारनं जीआर मागे घेतला. सरकारनं जीआर मागे घेतल्यानंतर आता प्रकरण निवळेल असं वाटलेलं, पण हिंदी विरुद्ध मराठी अशा वादाला जणू तोंड फुटलं. या प्रकरणावर अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं, अशातच आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंनी (Abhijit Bichukale) खास स्टाईलमध्ये आपलं मत व्यक्त केलं आहे. 

अभिजीत बिचुकलेंना(Abhijeet Bichukale) एका मुलाखतीत बोलताना मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावर प्रश्न विचारला.  राज्यात चालणाऱ्या भाषेच्या सक्तीबाबत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? अलं अभिजीत बिचुकलेंना विचारण्यात आलं. यावर बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, "कोणीही फक्त 'पब्लिसिटी'साठी काहीही करू नये!" 

पुढे बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, "महाराष्ट्रासाठी उद्याचा नेता फक्त आणि फक्त अभिजीत बिचुकलेच आहे. सगळ्यांची वय, त्यांचे कारनामे, कटकारस्थानं बघा. आजपर्यंत दारू आणि मटणावर अनेकांच्या निवडणुका झाल्या... आधी काँग्रेस होती, मग भाजप आली आणि त्यानंतर अभिजीत बिचुकलेच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल, मी कोणासोबत जाणार नाही."

छत्रपतींच्या गादीचा खरा वारसदार आलाय : अभिजीत बिचुकले 

"मी शिवरायांचा वैचारिक माणूस आहे, त्यामुळे राजगादीबरोबर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडेच यावं लागेल. आजपर्यंत तुम्ही राजगादीचा गैरवापर केला, छत्रपतींच्या नावाचा गैरवापर केला. आता त्यांचा खरा वारसदार आला आहे... अभिजीत बिचुकले!", असा दावा अभिजीत बिचुकले यांनी बोलताना केला. 

"उदयनराजे शांत आणि सभ्य असतील, पण मी त्यांच्यापेक्षाही सभ्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर इथून पुढे मी कोणालाही करू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझी आहे!", असंही अभिजीत बिचुकले म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल