aashram 3 fame aaditi pohankar : मुलींसोबत छेडछाड आणि बॅड टच केल्याच्या घटना सातत्याने समोर आलेल्या पाहायला मिळतात. मात्र, काही अभिनेत्री देखील अशा वाईट कृत्यांना सामोरे गेल्या आहेत. नुकताच 'आश्रम 3' मध्ये पम्मी पैलवानची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती पोहनकर हिने तिच्या बरोबर झालेल्या गैरकृत्याचा खुलासा केलाय. तिने सांगितलं की, शाळेतील एका मुलाने लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना माझ्या ब्रेस्टला पकडलं होतं.
हॉटरफ्लाईला दिलेल्या एका मुलाखतीत आदिती पोहनकर म्हणाली, 'मी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये शाळकरी मुलांना येण्याची परवानगी होती. मी 11वीत होते आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आमच्या डब्ब्यातून प्रवास करण्याची परवानगी होती. शाळेच्या गणवेशातील मुलांना आत येण्याची परवानगी होती. मी आत गेले तेव्हा एक मुलगा उभा होता आणि ट्रेनने स्टेशन सोडताच मला वाटतं ते दादर आहे, तेव्हा त्याने माझ्या ब्रेस्टला पकडले.
तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली होती आदिती
पुढे बोलताना आदिवतीने सांगितले की, माझ्याशी गैरकृत्य करणाऱ्या मुलाची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचले होते. माझ्यासोबत ती घटना घडल्यानंतर मी पुढच्या स्टेशनवर उतरले आणि पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी विचारलं, काही जास्त घडलं का? मी त्यांना म्हणाले, मला मानसिकरित्या त्रास देण्यात आलाय. तेव्हा पोलीस म्हणाले, आता कुठे शोधणार त्याला? माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, तो मुलगा तिथे उभा होता. जिथे त्याने माझ्याशी गैरकृत्य केले. मी त्याला ओळखल्यानंतर पोलीस मला म्हणाले की, तुमच्याकडे काय पुरावा आहे?
पुढे बोलताना आदिती म्हणाली, मी म्हणाले की त्याने माझ्याशी गैरकृत्य केलंय, मी खोटं का बोलू? माझ्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबल आली आणि त्या मुलाला विचारलं की तू तिच्यासोबत काही केलंस का? तर तो नाही म्हणाला. मी त्याच्यावर ओरडले. मात्र नंतर मी त्याला घाबरले कारण तो लहान मुलगा होता. मी त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे होते. मग मी त्याला मारणार असल्याचा इशारा केला तेव्हा तो म्हणाला हो, सॉरी, सॉरी.
इतर महत्त्वाच्या बातम्या