Aashay Kulkarni :  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'माझा होशील ना' (Majha Hoshil Naa) या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा (Murambaa) या मालिकेत आशय झळकणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमधून आशयची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सध्या मुरांबा ही मालिका रंजक वळणावर आहे. अक्षय आणि रमाच्या नात्यामध्ये रेवा नावाचं वादळ उभं आहे. पण आता रेवाचं एक मोठं सत्य आशय आल्याने बाहेर पडणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 


वाहिनीकडून मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. यामध्ये आशय कुलकर्णी हा रेवाच्या आधीच्या प्रियकर असल्याचं समोर येतं. नेहमी काही तरी कारण खोटं बोलणाऱ्या रेवाचं आणखी एक सत्य बाहेर येणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यामुळे आता आशयच्या येण्याने मालिकेत मालिकेला कोणतं नवं रंजक वळण मिळणार याची वाट प्रेक्षक पाहतायत. 


मालिकेच्या प्रोमोमध्ये काय? 


धुळवडीच्या निमित्ताने मुकादमांच्या घरी उत्साहाचं वातावरण असतं. रंगाच्या रंगात न्हाऊन गेलेल्या मुकादमांसह रेवाच्या आयु्ष्यात आणखी एक नवा रंग येणार आहे. याचवेळी आशयची एन्ट्री होते. तो रेवाला म्हणतो की तू माझ्यापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न कर मी तुझ्या कायमच जवळ आहे. त्यावेळी रेवाच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडतो. 


रेवाचं खरं रुप मुकादमांच्या समोर येणार? 


रेवाचं अक्षयवर प्रेम असल्याचं म्हणत ती मुकादमांच्या घरी राहत असते. अक्षय रेवाला प्रतिसाद देत नसल्याचं आता रेवा अभिषेकला देखील नादाला लावत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अक्षय आणि रमाच्या नात्याला लागलेलं रेवा नावाचं ग्रहण आता आशयच्या एन्ट्रीने दूर होणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दरम्यान या मालिकेत आशय अर्थव हे पात्र साकारणार आहे. 


आशयच्या कामाविषयी 


आशय हा काहीदिवसांपूर्वी आलेल्या व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकला होता. तसेच त्याने झी मराठीवरील  ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेत काम केलं आहे. त्याप्रमाणे आशय हा  ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. 






 


ही बातमी वाचा : 


Marathi Actress : मराठी अभिनेत्रीकडून कंगनाचं अभिनंदन, 'विजयभव:' म्हणत शेअर केली पोस्ट