Aarya Ambekar : ‘सारेगामाप लिटील चॅम्प्स’ या संगीत कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी गायिका आर्या आंबेकर (Aarya Ambekar) सध्या याच शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याने आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली. आता पुन्हा एकदा आर्याला अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला यायचे आहे.

Continues below advertisement

स्वतः आर्यानेच अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली आर्या आपल्या चाहत्यांशी नेहमीच कनेक्टेड असते. नुकतंच आर्याने ‘आस्क मी’ सेशन केलं. यामध्ये तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने तिला अभिनय करण्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी आर्याने अभिनय करण्याची इच्छा जाहीर केली आहे.

काय म्हणाली आर्या?

Continues below advertisement

आर्या आंबेकरने ‘आस्क मी’ सेशन दरम्यान चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या सेशनदरम्यान एका चाहत्याने आर्याला प्रश्न विचारला की, ‘अनेक मालिकांसाठी शीर्षक गीत गायले आहेस, मालिकेत मुख्य भूमिका ऑफर झाली तर साकारशील का?’ यावर उत्तर देताना आर्या म्हणाली, ‘मी अजून तसा काही विचार केलेला नाही. पण, सतीश राजवाडेंच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी एखादी मालिका असेल, तर त्यात काम करायला मला नक्की आवडेल.’

आता आर्याच्या या उत्तरानंतर तिच्या चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे. पुन्हा एकदा आर्या अभिनय करताना दिसेल, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. दरम्यान, आर्या खरंच एखाद्या मालिकेत काम करतेय का? असा प्रश्न देखील चाहते उपस्थित करत आहेत. मात्र, आर्याने अजून या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha