Suraj Chavan : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात सूरज चव्हाण (Suraj Chavan) या स्पर्धकाने घरातल्यांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकलीत. त्याचप्रमाणे दुसऱ्या आठवड्यातील त्याच्या खेळालाही प्रेक्षकांनी आणि रितेश भाऊंनी शाबासकीही दिली. सोशल मीडियावर सूरजसाठी बराच सपोर्ट तयार झाला आहे. पण सध्या बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकाने आणि मराठी अभिनेत्रीने सूरजसाठी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज हा एकट्याने नडला होता. त्यानंतर त्याच्या या खेळाचं रितेश देशमुखनेही भरभरुन कौतुक केलं आणि दुसरा आठवडा हा सूरजने गाजवल्याचं म्हटलं. पण सूरज या सिंपथीवर पुढे जाऊ शकत नाही, असं अभिनेत्री आरती सोळंकी हिचं म्हणणं आहे. तिने नुकतच अल्ट्रा मिडिया बजला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे.
'...तर मी बिग बॉस पाहणं बंद करेन'
आरतीने म्हटलं की, मी साधा, भोळा, गरीब मी इथून आलोय, तिथून आलोय असं बोलून नाही चालत. कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप कठीण आहे. त्यामुळे माझी सिंपथी या गोष्टीला अजिबात नाही. मी सुद्धा गरीब आहे, चाळीतली पोरगी आहे. त्यामुळे एखादा गरीब कुणीतरी जिंकलं तर नक्की आवडेल. मी स्वामींच्या चरणी त्याच्यासाठी प्रार्थना करेन की त्याला आणखी फेम मिळू दे या कार्यक्रमातून, जिथे आता 80 हजार घेतोय तिथे 8 लाख घेऊ दे. पण काहीच खेळ न खेळता, काहीच न करता तो पुढपर्यंत गेला आणि जिंकला तर मी तरी पुढचा सिझन बघणार नाही. हे मी आताच स्पष्ट करतेय. मी अशी सिंपथी नाही पचवू शकत. कारण तो गेम खूप कठीण आहे. मग तुम्ही सगळे गरीब घ्या, मग मी पण येते मी पण गरीब आहे.
ही बातमी वाचा :
Kiran Mane : 'कलाकार ब्राह्मण समाजातील 'गुड लुकींग' हवा', व्हायरल पोस्टवर किरण मानेंची कमेंट चर्चेत