Aaradhya Bachchan: बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन ( (Aaradhya Bachchan). आराध्या कायमच चर्चेत असते. सध्या आराध्या चर्चेत आली आहे ते तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे. युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चनने (Aaradhya Bachchan) उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना आराध्याने सांगितलं की, काही युट्यूब (Youtube) आणि वेबसाईटवरून आराध्याच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. प्रकृतीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अशा युट्यूब चॅनेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
आराध्या अनेकदा ट्रोल
आराध्या बच्चन 11 वर्षांची असून सोशल मीडियावर (Social Media) तिचा बोलबोला असतो. आराध्या ही बॉलीवूड स्टार किड्समध्ये सर्वात लोकप्रिय स्टार किड (star kid) आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबतची (Aishwarya Rai Bachchan) तिची बाँडिंग स्पेशल आहे. ऐश्वर्या आराध्याला नेहमी सोबत घेऊन असल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी आराध्यावर अनेक वेळा टीका देखील झाली.
अनंत अंबानीच्या साखरपुड्यात आराध्याने वेधले लक्ष
ऐश्वर्या अनेकदा तिच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण अनंत अंबानीच्या साखरपुड्यात आराध्याचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आराध्याच्या फोटोवर 'छोटी परी एवढी मोठी कधी झाली', अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याने साखरपुड्यात अनारकली ड्रेस परिधान केला होता. त्यांचा पारंपारिक लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आराध्याने सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चनला टक्कर दिली असल्याचं चाहते म्हणाले. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्याचे फोटो व्हायरल होत आहेत.