Aamir Khan upcoming movie 3 Idiots 2: 2009 साली प्रदर्शित झालेला  '3 इडियट्स' हा सिनेमा जबरदस्त हिट झाला. हा सिनेमा आजही प्रेक्षकवर्ग आवर्जून पाहतात.  राजकुमार दिग्दर्शित '3 इडियट्स' या सिनेमात 3 मित्रांची मैत्री आणि करिअर करतानाच्या अडचणी, सोसायटीचं प्रेशर दाखवण्यात आलं आहे.  या सिनेमातील कथा समाजातलं वास्तव दाखवते. या सुपरहिट सिनेमात आमिर खान, शरमन जोशी  आणि आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून जबरदस्त रेस्पॉन्स मिळाला होता. दरम्यान, या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी एक नवी अपडेट समोर आली आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, या सिनेमात आणखी एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

17 वर्षांनंतर आमिर खानच्या '3 इडियट्स' या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, फिल्ममेकर्सकडून चाहत्यांसाठी एक खुशखबर. लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता '4 इडियट्स' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ब्लॉकबस्टर सिनेमात आणखी एका अॅक्टरची एन्ट्री होणार आहे. तो अॅक्टर नेमका कोण आहे? हे जाणून घेण्याची  उत्सुकता प्रत्येक चाहत्याला आहे. दरम्यान, या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.   

'3 इडियट्स' च्या कास्टमध्ये चौथ्या इडियटची एन्ट्री (4 Idiots with Aamir Khan and Vicky Kaushal)

पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विकी कौशल या सिनेमात चौथ्या इडियटची भूमिका साकारणार आहे. कारण 10 वर्षांच्या कालावधीनंतर या चित्रपटाला एक नवीन वळण मिळणार आहे.   दरम्यान, विकी कौशलच्या एन्ट्रीमुळे या सिनेमाला  एक ट्विस्ट मिळेल, अशी माहिती समोर आली आहे.  पिंकव्हिलाच्या  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्टर  परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत  अभिनेता विकी  कौशल स्क्रीन शेअर करणार आहेत.  या फ्रँचायझीचा  भाग बनण्यास अभिनेता उत्सुक आहे. 

Continues below advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार,   विकी कौशल, आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्यात  सतत भेटीगाठी सुरु आहेत.  विकी कौशल देखील चौथ्या इडियटची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी उत्सुक आहे. अभिनेत्याने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला आहे.    दरम्यान,  संपूर्ण कास्टचे डेट्स अद्याप फायनल झालेले नाहीत. 'महावतार'च्या शूटिंगनंतरच विकी कौशल  '3 इडियट्स 2' ची शूटिंग करु शकतो.  सिनेमाच्या सिक्वेलबाबतीत अमर उजालाशी बोलताना  आमिर खानने मोठी हिंट दिली होती. त्यामुळे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल, हे कन्फर्म आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला मुख्यमंत्री व्हायचंय...'; तामिळनाडू विधानसभेतील थलपती विजयच्या दणदणीत विजयानंतर तृषा कृष्णनचा 'तो' VIDEO व्हायरल