Trisha Krishnan Viral Video on CM: थलापती विजयने (Thalapathy Vijay) तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत नवा इतिहास रचला. राज्यातील जनतेनं, विजयच्या टीव्हीके पक्षाला 108 जागांवर दणदणीत विजय मिळवून दिला. अवघ्या 2 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या पक्षाने अल्पावधीत ही जादू केली.  एमके स्टालिन यांची केवळ हातातून सत्ता निसटली नाही तर, स्वत: देखील कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले.   आता थलापती विजय (Trisha Krishnan)  तामिळनाडूचे मुख्यमंत्री होणार आहेत. 

Continues below advertisement

सोमवारी थलापती विजय यांच्या घरात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण होते. दरम्यान, काल तृषा कृष्णनची बरीच चर्चा रंगली. काल तृषा कृष्णनचा वाढदिवस होता. चाहते तृषा कृष्णनला लेडी लक असं म्हणत आहेत.  काल वाढदिवसानिमित्त आधी तृषा कृष्णन तिरुपती मंदिरात (Tirupathi) गेली होती. नंतर दुपारपर्यंत निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच,  तृषा कृष्णन थलापती विजय यांच्या निवासस्थानी जाताना दिसली.  अशातच तृषा कृष्णनचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.   यात तृषाने तामिळनाडूची मुख्यमंत्री होण्याची इच्छा  व्यक्त केली. 

तृषा कृष्णनचा जुना व्हिडीओ व्हायरल (Trisha Krishnan old video about becoming CM)

 

Continues below advertisement

तृषा कृष्णनचा हा व्हिडीओ 12 वर्षे  जुना आहे.  तिचा हा व्हिडीओ एक्सवर व्हायरल होत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा हा व्हिडीओ 2004 चा आहे. अभिनेत्री तामिळ भाषेत रिपोर्टरच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. या व्हिडीओत ती म्हणते की तिला  तामिळनाडूची  मुख्यमंत्री व्हायचं आहे. रिपोर्टरला शॉक बसतो.  पत्रकार तिला, कसे?  असा प्रश्न विचारतो.  यावर तृषा आधी हसते, नंतर आत्मविश्वासाने म्हणते, 'तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा,  फक्त काही दिवस वाट पाहा. मला दहा वर्षे द्या, फक्त काही वेळ द्या', असं अभिनेत्री म्हणते. 

तृषा कृष्णनच्या व्हिडीओवर चाहत्यांनी रिअॅक्ट केलं आहे.  तिनं केलेली भविष्यवाणी आणि आत्मविश्वास यावर  चाहते घायाळ झाले आहेत. एका चाहत्याने व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं की, 'एक दिन पक्का.. तिचा आत्मविश्वास पाहून असं वाटतं नक्की होणार'.  तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'तृषाचं पूर्ण नाव तृष्णा कृष्णन आहे आणि मला असं वाटलं की, TVKचा अर्थ, तृषा कृष्णन विजय असं आहे'. असा अंदाज एका नेटकऱ्याने लावला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...