Aamir Khan On Bollywood Stars Demands: जेव्हा अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) फ्लॉप होऊ लागले, तेव्हा चित्रपटांच्या (Bollywood Movies) निर्मिती खर्चाबाबत चर्चा तीव्र झाली. चर्चांमधून असं दिसून आलं की, मोठ्या चित्रपटांच्या बजेटचा मोठा भाग कलाकारांच्या फी आणि शूटिंग दरम्यानच्या त्यांच्या राहणीमानावर आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या टीमवर खर्च होतो. फराह खान, राकेश रोशन आणि संजय गुप्ता यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity)) यावर यापूर्वीही टीका केली आहे. अशातच आता चक्क एका बॉलिवूड सुपरस्टार आणि निर्मात्यानंही यावर भाष्य केलं आहे. आमिर खाननं अशा स्टार्सच्या ग्रेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आमिर खान म्हणाला की, आजही असे कलाकार आहेत, जे त्यांच्या निर्मात्यांवर आणि चित्रपटावर अन्याय करतात, हे खरंच लज्जास्पद आहे.
निर्मात्याला त्रास देण्याबाबत आमिर खान काय म्हणाला?
कोमल नाहटा यांच्याशी खास संवाद साधताना आमिर खान म्हणाला की, "स्टार्सना ओळख मिळाली पाहिजे, पण इतक्या टप्प्यावर नाही की, ते निर्मात्यासाठी समस्या बनतील." आमिर खानने तो इंडस्ट्रीत आला तेव्हाच्या काळाबाबत सांगितलं की, 37 वर्षांपूर्वी जेव्हा तो इंडस्ट्रीत आला तेव्हा निर्माते स्टारच्या ड्रायव्हरची आणि हेल्परची फी भरायचे. आमिर खान पुढे बोलताना म्हणाला की, "मला ते खूप विचित्र वाटायचं. मला वाटायचं की, जर ड्रायव्हर आणि हेल्पर माझ्यासाठी काम करत असतील तर निर्माता त्यांची फी का भरेल? आमिर खान म्हणाला की, जर निर्माता माझ्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांना पैसे देत असेल तर, तो माझ्या मुलांच्या शाळेची फी सुद्धा भरेल का? हे कुठे आणि कसं थांबेल?"
"कलाकारांना ओळख मिळाली पाहिजे. पण, एवढीही नाही की ते निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरतील. एकेकाळी निर्मात्यांना सेलिब्रिटींचे ड्रायव्हर आणि त्यांच्या इतर कामगारांचा खर्च उचलावा लागत होता, अशी सिस्टीम होती. मला हे खूपच विचित्र वाटलं होतं. मला असं वाटायचं की ड्रायव्हर आणि कामगार माझ्यासाठी काम करायचे तर त्यांचा खर्च निर्मात्यानं का उचलावा? जर निर्माता माझे वैयक्तिक खर्च उचलत असेल तर माझ्या मुलांची फीदेखील त्यानेच भरावी का? निर्मात्यानं केवळ कलाकारांचा सिनेमाशी निगडीत असलेला खर्च उचलला पाहिजे.", असं आमिर खान म्हणाला.
"आता तर हे अधिक गंभीर होत चाललं आहे. मी असं ऐकलंय की, आजकाल सेलिब्रिटी त्यांच्या ड्रायव्हरचे पैसेही देण्याची तसदी घेत नाहीत. ते निर्मात्यांना त्याला पैसे द्यायला सांगतात. एवढंच नाही तर कलाकारांच्या स्पॉट बॉयचा खर्चही निर्माता उचलतो. सेटवरही सेलिब्रिटींचे वेगळे किचन असतात. त्याचेही पैसे निर्मात्यानं भरावे, अशी त्यांची अपेक्षा असते. किचन, जीम या गोष्टींसाठी ते व्हॅनिटी व्हॅनचीही मागणी करतात...", असंही आमिर खाननं सांगितलं.
"कलाकार कोट्यवधी रुपये कमावतात. तरीदेखील आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत? मला हे विचित्र वाटतं. निर्मात्यांवर हा सगळा खर्च टाकल्यानं इंडस्ट्रीचं नुकसान होतंय. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे... सिनेमातील भूमिकेसाठी लागणाऱ्या ट्रेनिंगचा खर्च या गोष्टी ठीक आहेत. पण, याव्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक सोयी सुविधाचं निर्मात्यावर ओझं लादू नये. असंच चालू राहिलं तर कलाकार निर्मात्यांकडून त्यांच्या फ्लॅटचे हफ्ते भरण्याचीही अपेक्षा करू लागतील", असं म्हणत आमिर खाननं सेलिब्रिटींचे कान टोचले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :