Aamir Khan Raj Thackeray: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या आपला भाचा इम्रान खानमुळे (Imran Khan) चर्चेत आहे. इम्रान खानला मुंबईच्या परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने 28 ऑक्टोबर 2026 पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याला मिळालेल्या नोटीशीला आव्हान दिले आहे. या सर्व प्रकरणात आमिर खान चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. आमिर खानने थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची भेट घेतली.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या शिवतीर्थ या निवसस्थानावर जाऊन भेट घेतली असल्याची माहिती आहे. या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, आमिर खानसोबत त्याची पत्नी गौरी स्प्रट देखील उपस्थित होती, अशी माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला भारत देश सोडून देण्याची नोटीस पाठवण्यात आली होती.
आमिर खान आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचे नाते सर्वश्रुत आहे. त्या दोघांच्या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दरम्यान, इम्रान खान प्रकरणी आमिर खानने राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनीही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याविरोधात भूमिका मांडली आहे. त्यामुळे आमिर खान आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरुन सध्या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप नेते किरीट सौमय्या यांचा आरोप, नेमकं प्रकरण काय? (Aamir Khan and Gauri Spratt Meet Raj Thackeray at Shivteerth)
10 ऑक्टोबर 2026 रोजी अभिनेता इम्रान खान आणि त्याची मैत्रीण लेखा वॉशिंग्टन या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सीजेपीच्या आंदोलनात सहभाग होण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानात पोहोचले होते. अभिनेत्याला तिथे ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे इम्रान खानच्या आंदोलनातील सहभागाच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
