Aamir Khan And Arijit Singhs Secret Meeting Sparks Curiosity: अरिजीत सिंहने (Arijit Singh) अचानक पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही बातमी खरंतर, त्याच्या चाहत्यांना धक्का देणारी होती. त्यानं या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं प्लेबॅक सिगिंगमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir khan) त्याची भेट घेण्यासाठी त्याच्या निवासस्थानी गेला.  रविवारी आमिर खान कोलकाता विमानतळावर दिसला होता. त्यानं पापाराझींसोबत बोलणं टाळलं होतं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Continues below advertisement

वृत्तानुसार, आमिर खानला अरिजीत सिंहसोबतची भेट पूर्णपणे खासगी ठेवायची होती.  आमिर खान कोलकाता विमानतळावरून थेट अरिजीत सिंहच्या भेटीसाठी त्याच्या निवासस्थानी गेला होता. दोघांचीही भेट पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. रविवारी सायंकाळी  आमिर खान पोहोचले तेव्हा परिसरातील लोकांना याची माहिती मिळाली.  

 

Continues below advertisement

दोघांच्या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  व्हिडिओंवरून स्पष्ट होते की, आमिर आणि अरिजीतची भेट खूपच खास होती.   यादरम्यान, आमिर खान अरिजीत सिंहच्या घराच्या छतावर पतंग उडवण्यासाठीही गेला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हायरल व्हिडिओत अरिजीत सिंह पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत.   दरम्यान,  आमिर खान आणि अरिजीत सिंहच्या भेटीबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  भेट जरी झाली असली तरी, भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. असे म्हटले जात आहे की, आमिर खान अरिजीत सिंहशी त्याच्या निर्णयाबद्दल बोलू इच्छित होता.  

या काळात आमिर खानने अरिजीत सिंहला समजवण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत अरिजीत सिंहने आमिर खानच्या अनेक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. दरम्यान, दोघांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.