Aaishvary thackeray New Project in YRF Film: राजकीय वर्तुळात सर्वात प्रतिष्ठित घराण्यांपैकी एक म्हणजे ठाकरेंचं कुटुंब (Thackeray Family). ठाकरे घराण्यातील सदस्य आता राजकारणात नाही तर, सिनेविश्वातही नशीब आजमावण्यास सज्ज झाला आहे. शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि स्मिता ठाकरे यांचे पुत्र ऐश्वर्य ठाकरे, बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून ओळख निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. अनुराग कश्यप यांच्या 'निशांची'मधून सिने करिअरमध्ये सुरुवात करणारा अभिनेता आता यशराज फिल्म्सच्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकण्यास सज्ज झाला आहे.
अली अब्बास जफ्फर दिग्दर्शित अनटाइटल्ड रोमँटिक अॅकशन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात ऐश्वर्य ठाकरे याची मुख्य भूमिका असून, त्याच्यासह अहान पांडे, शरवरी वाघ आणि बॉबी देओल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आदित्य चोप्रा आणि अली अब्बास जफर यांची एकत्रित ही पाचवी फिल्म असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 मार्च 2027 रोजी म्हणजेच (गुड फ्राइडे)ला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. ऐश्वर्य ठाकरे याचा हा अभिनेता म्हणून दुसरा सिनेमा असणार असल्याची माहिती आहे.
ऐश्वर्य ठाकरे याची पार्श्वभूमी पूर्णपणे राजकीय आहे. ऐश्वर्य ठाकरे याचे आजोबा, शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर नेहमी वर्चस्व राहिले आहे. दरम्यान, ऐश्वर्य ठाकरेने आपल्या स्थापित राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी त्याने वेगळा मार्ग निवडला. त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून त्याची कला आणि अभिनयाप्रति आवड असल्याचं त्याने कायम सांगितलं. यामुळे त्याने राजकीय वर्तुळात न राहता फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
ऐश्वर्य ठाकरे लवकरच यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या सिनेमात झळकणार (Aaishvary thackeray in YRF New Project)
सिने विश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी ऐश्वर्य ठाकरेने चित्रपटातील बारकावे समजून घेतले. 2015 साली प्रदर्शित झालेला 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात त्याने असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं. कॅमेऱ्यासमोर येण्यापूर्वी त्याने अॅक्टिंग स्किल्स शिकून घेतल्या. अनुराग कश्यप यांच्या 'निशांची' या सिनेमातून त्याने अभिनेता म्हणून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. लाइमलाइटमध्ये असणारे कलाकार सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतात. मात्र, ऐश्वर्य ठाकरे हा सोशल मीडियापासून दूर राहतो.
इन्स्टाग्रामवर त्याचे साधारण 17 हजार फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या फीडमध्ये केवळ 8 पोस्ट असल्याची माहिती आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो फिटनेस आणि डान्सिंगसाठीही चर्चेत असतो. त्याच्या डान्सिंगचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
