Abhijeet Dipke Parents : कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे. अभिजीत दीपके यांची तब्येत बिघडली असून, त्यांना टायफॉइड झाल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे. यापूर्वी कधीही अभिजीतला असा त्रास झाला नव्हता, त्यामुळे त्याच्या प्रकृतीची आम्हाला मोठी चिंता आहे, अशी भावना त्यांच्या आई-वडिलांनी (Abhijeet Dipke Parents)  व्यक्त केली. हवं तर धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना संरक्षण मंत्री, गृहमंत्री करा, पण शिक्षण मंत्री पदावर ठेवू नका, तरच हे आंदोलन थांबेल, अशी प्रतिक्रिया देखील अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी दिली आहे.

Continues below advertisement

नीट (NEET) पेपरफुटीच्या (Paper Leak)  पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे सुरू असलेल्या आंदोलनाने आता अधिक आक्रमक रूप धारण केले आहे. या आंदोलनातून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केंद्र सरकार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा आणखी मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे,अभिजीत दीपके यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा

Continues below advertisement

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. अभिजीत हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढत असून, त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. आता हे आंदोलन अभिजीतच्या हातातही राहिलेलं नाही, देशव्यापी झालं आहे. त्यामुळे तोडगा एकच आहे, तोम्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. असेही अभिजीत दीपके यांचेआई-वडीलम्हणाले.

Abhijeet Dipke Parents on Delhi Police : दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, आंदोलन मोडून काढण्यासाठी....

मात्र, दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने मारहाण करण्यात आली. सरकारकडून अभिजीतच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्याच्या आई-वडिलांनी केला आहे. सरकारने अभिजीतच्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक चर्चा करावी. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने सकारात्मक चर्चा केल्यास हे आंदोलन संपुष्टात येईल आणि विद्यार्थी आपापल्या घरी परततील, अशी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या