Aai Tuljabhavani: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’चा येत्या रविवारी होणारा एक तासाचा विशेष महारविवार भाग प्रेक्षकांना उत्कंठेच्या शिखरावर नेणारा आहे. या विशेष भागासोबतच मालिका 400 भागांचा दैदिप्यमान टप्पा पार करत आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या अपार प्रेमामुळेच ‘आई तुळजाभवानी’चा हा प्रवास शक्य झाला. या विशेष भागात महिषासुराचा अंश असलेला आणि तुळजेला महिषासुरासमोर नेण्याची विकृत इच्छा बाळगून वावरणारा महिपती, आपल्या दुष्ट योजनेसाठी अंधःकाराच्या शक्तींचा वापर करत नवा, भयंकर डाव रचताना दिसतो.

Continues below advertisement

महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला, जगदंबा कशी सामोरी जाणार?

जगदंबा चिंचपुरात पोहोचली तर तुळजाईची उर्जासमत्व साधले जाईल, जगदंबेला तिच्या शक्तीची जाणीव होईल आणि तिची स्मृती जागृत होऊन महिपतीचे सर्व प्रयत्न व्यर्थ होतील, या भीतीने तो पाताळातील अक्राळविक्राळ अग्निकुंडात अंधःकार शक्तींना आव्हान करतो. त्याच्या या अघोरी विधीमुळे आकाशातून उसळलेला काळा धूर जगदंबा, शिवा आणि नंदी यांच्या मार्गात येत त्यांच्या तिघांमध्ये प्रचंड अंतर निर्माण करतो. महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला, जगदंबा कशी सामोरी जाणार? हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘आई तुळजाभवानी’, रविवार ३० नोव्हेंबर, महारविवार -एक तासाचा विशेष भाग, रात्री ९ वा., आपल्या कलर्स मराठीवर!

एक तासाचा विशेष महारविवार भाग

महिपतीने पाताळात अंधःकार शक्तींना आव्हान केल्याने रस्त्यात चालताना अचानक जमिनीतील फटीतून घोंघावणारी वटवाघुळे आणि त्यासोबत उसळलेला काळा धूर जगदंबेला वेढतो. धुराची उंच भिंत निर्माण होऊन तिचा शिवा आणि नंदीशी संपर्क तुटतो. शिवा आणि नंदी तिला हाक मारतात, पण तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. याच काळ्या धुराच्या भिंतीमध्ये अचानक उघड्या दरवाज्यांच्या गूढ चौकटी निर्माण होतात. प्रत्येक दरवाजा जणू एखाद्या नवीन विश्वाची दारं उघडतो-कधी अथांग वाळवंट,कधी ब्रह्मांडाची खोली,कधी अनंत समुद्र,तर कधी हिमालयाचे शांत पण कठोर सौंदर्य.या सर्वांमध्ये अडकलेल्या जगदंबेला प्रश्न पडतो- “इथून बाहेर कसे पडता येईल?”

Continues below advertisement

या चक्रव्यूहात अडकलेली जगदंबा, अंधःकार शक्ती आणि महिपतीच्या या  मायावी गूढ डावाला कशी तोंड देईल? तिच्या सुप्त दैवी शक्तींचा जागर होणार का? शिवा आणि नंदी तिला शोधून काढतील का? महिपतीने रचलेल्या या चक्रव्यूहाला, जगदंबा कशी सामोरी जाणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक तासाचा विशेष महारविवार भाग नक्की पाहा -‘आई तुळजाभवानी’, 30 नोव्हेंबर, महारविवार, रात्री 9 वा., आपल्या कलर्स मराठीवर!