Rashmika Mandanna :  प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबईतील अटल सेतूवर रश्मिकाने हा व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने पंतप्रधान मोदी आणि अटल सेतूचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. पण यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रिट्विट करत काही गोष्टी मांडल्या. रश्मिकाच्या या व्हिडिओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्यावर आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) ट्विटमुळेही बरीच खळबळ माजली. 


दरम्यान रश्मिकाने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळेही या व्हिडिओची बरीच चर्चा झाली. या व्हिडिओमध्ये रश्मिकाने अटल सेतूविषयी माहित दे शेवटी विकासाला मत द्या असं आवाहन लोकांना केलं आहे. त्यामुळे रश्मिकाचे चाहतेही तिच्यावर नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी कमेंट करत रश्मिकावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. एकाने कमेंट करत म्हटलं की, 'ऍनिमल सारखा चित्रपट बनव आम्ही तो हिट करू पण अशा जाहिराती करू नको' तर दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं की, 'प्रिय रश्मिका पूल आणि मूर्ती यांच्यावर व्हिडिओ बनवतेस तसं मणिपूर मध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी सुद्धा आम्हाला तुझा व्हिडिओ पाहायला आवडेल. की मणिपूरला भारताचा भाग कसं बनवता येईल.'






आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया


रश्मिकाच्या या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंनीही पोस्ट केली आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, मी नुकतच एका अभिनेत्रीला अटल सेतूची जाहिरात करताना पाहिले (यासाठी पैसे दिलेही असतील कदाचित) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सध्याच्या राजवटीमध्ये अटल सेतू म्हणून ओळखला जातो. यामध्ये काही गोष्टी मिसिंग आहेत. अटल सेतू- MTHL चे 85% काम जून 2022 पर्यंत पूर्ण झाले होते, जेव्हा आमचे सरकार पाडण्यात आले होते. हे काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये करण्यात आले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने 2022 ते 2024 पर्यंत उर्वरित 15% पूर्ण करण्यासाठी आणि नंतर उद्‌घाटनाला हेतूपुरस्कार उशीर केला.'


पुढे आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, 'भाजपच्या नेतृत्वाखालील मिंधे राजवटीने MTHL चे उद्घाटन पूर्णतः तयार झाल्यानंतर 3 महिन्यांनी केले कारण त्यांना VIP उद्घाटनाच्या तारखा मिळाल्या नाहीत- मुंबईची प्रगती रोखून धरली. शेवटी ही अभिनेत्री म्हणते की जागे व्हा आणि विकासाला मत द्या, म्हणजेच भाजपाला मत देऊ नका असा याचा अर्थ होतो. अशा जाहिराती करणाऱ्या सर्वांना एक नम्र विनंती- कृपया चित्रीकरण करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा.  काही पक्षांना 'वार रुकवा दी' सारख्या जाहिराती करण्यासाठी कलाकार मिळत आहेत.'






ही बातमी वाचा : 


Sharmishtha Raut :  शर्मिष्ठाने तिची पहिली कमाई ललित प्रभाकरला का दिली? अभिनेत्रीने सांगितला भावनिक प्रसंग