Continues below advertisement

A. R. Rahmans Debut: ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर रहमान लवकरच एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दशकांपासून आपल्या संगीत प्रतिभेने प्रेक्षकांना मोहित करणारे रहमान पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना दिसणार आहे. प्रभुदेवा अभिनीत 'मूनवॉक' या चित्रपटातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. 'मूनवॉक' हा मनोज एन एस दिग्दर्शित आणि बिहाइंडवुड्स प्रॉडक्शन निर्मित एक विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ए. आर रहमान एंग्री यंग दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे.

ए. आर रहमान दिसणार नव्या भूमिकेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ए. आर रहमान केवळ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार नसून, त्यांनी या चित्रपटातील पाचही गाणी गायली आहेत. याचा अर्थ असा की, चित्रपटाचे संगीत पूर्णपणे ए. आर रहमानच्या आवाजात आणि शैलीत असेल. या चित्रटातून ए. आर रहमान यांची वेगळीत भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक एन. एस म्हणाले की, "प्रभुदेवा आणि ए. आर रहमान यांच्यासोबत मायले या गाण्याचे चित्रीकरण केले. या गाण्याचे शुटिंग उत्तमरित्या झाले. चित्रीकरण करतानाचा अनुभव अद्भुत होता", असं दिग्दर्शक म्हणाले.

Continues below advertisement

फक्त गाण्यापूरते नाही, भूमिकेसाठीही दिली ऑफर

मनोजने असेही सांगितले की, "ए. आर रहमान सुरूवातीला गाण्यापूरते मर्यादित होते. परंतु, त्यानंतर त्यांना मोठी भूमिका ऑफर करण्यात आली. ही ऑफर त्यांनी आनंदाने स्वीकारली. ए. आर रहमान यांचा अभिनय पाहून सेटवरील सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. दरम्यान, ए. आर रहमान अभिनीत या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, गाण्याप्रमाणे चित्रपटात त्यांची अभिनयाची चालणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

या चित्रपटात प्रभुदेवा बाबुती नावाच्या एका तरूण कोरिओग्राफरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, अभिनेता योगी बाबू या चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसणार आहे. योगी बाबू या चित्रपटात कावरीमान नारायणन, आट्टु्क्कल अझगू राझा आणि दुबई मॅथ्यूसह अनेक पात्र साकारणार आहेत. योगी बाबूच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांचं कौतुक करण्यात आलं. या चित्रपटात अर्जुन अशोकन, सत्ज, सुष्मिता, निश्मा, स्वामीनाथन, रेडिन किंग्सले, राजेंद्रन, दीपा अक्का, संतोष जैकब आणि राजकुमार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वेड लावलं गं.. पाकिस्तानी क्रिकेटरचा सोनाली बेंद्रेवर जडलेला जीव; पाकिटात फोटो ठेवायचा; म्हणाला.. नाही ऐकलं तर तिला किडनॅप...