Shoaib Akhtar on Sonali Bendre: क्रिकेट आणि बॉलिवूडचे तसे जुनेच नाते. केवळ भारतीय क्रिकेटपटूंना नाही, तर परदेशी क्रिकेटपटूंनाही बॉलिवूडची क्रेझ आहे. अनेक विदेशी क्रिकेटपटूंचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होते. काहींनी लग्नही केलं. पाकिस्तानी क्रिकेटपटूही बॉलिवूड अभिनेत्रींचे चाहते आहेत. एकेकाळी पाकिस्तान संघातील माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा जीव एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर जडला होता. अख्तरचा इतका अभिनेत्रीवर जीव जडला होता की, त्याने तिला किडनॅप करण्याचा निर्णय घेतला होता.
सोनाली बेंद्रेचा 50 वा वाढदिवस
सोनाली बेंद्रे. बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री. आज तिचा 50 वा वाढदिवस. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 90 च्या दशकात अभिनेत्रीने संपूर्ण बॉलिवूड गाजवलं होतं. तिच्या सोज्वळ आणि सिंपल लूकचे लोक चाहते आहे. तिनं 90 दशकात अभिनयातून प्रेक्षकांना भूरळ घातली होती. सोनालीने बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत काम केलं होतं. तिचे गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे. फक्त चाहते नाही तर, क्रिकेटपटूही सोनाली बेंद्रेचे दिवाने होते. पाकिस्तानी संघातील क्रिकेटरला सोनाली बेंद्रे प्रचंड आवडत होती. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर तिच्यावर मोहित झाला होता. त्यानं एका मुलाखतीतून उघडपणे तिचे अपहरण करणार असल्याचं सांगितलं होतं.
सोनाली बेंद्रेवर जीव जडला होता
शोएब अख्तरने खुलासा केला की, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे खूप आवडत होती. सोनाली बेंद्रेबद्दल बोलताना अख्तर म्हणाला, "तिने जर प्रस्ताव स्वीकारला नाही, तर मी तिला किडनॅप करेन", असं तो हलक्या फुलक्या विनोदाने म्हणाला. त्याने केलेल्या विधानानंतर काही भारतीय चाहत्यांनी निषेध केला होता. काहींनी राग देखील व्यक्त केला.
सोनालीचा फोटो त्याच्या पाकिटात
अनेक माध्यमांच्या वृत्तांतून असाही दावा करण्यात आला की, शोएब अख्तर सोनालीचा फोटो त्याच्या पाकिटात ठेवत असे. त्याच्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती होती. परंतु, अख्तरची एकतर्फी प्रेमकहाणी पुढे गेली नाही. अख्तरच्या एकतर्फी प्रेमाचा शेवट झाला. दरम्यान, सोनाली बेंद्रेला एका मुलाखतीत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने शोएबच्या एकतर्फी प्रेमावर प्रतिक्रिया दिली होती. "मला माहिती नाही की, हे किती खरे आहे. त्यावेळी काही खोट्या बातम्या पसरवले जात होते", अशी प्रतिक्रिया सोनालीने दिली होती.
सोनाली म्हणाली की "मला क्रिकेट आवडत नाही. पण नवरा आणि मुलाला आवडते. दोघेही क्रिकेट बघायला जातात. पण मी क्रिकेट सामने बघायलाही जात नाही", असं सोनाली म्हणाली होती. हे प्रकरण तेव्हा खूप गाजलं होतं.