4th Richest Youtuber Of India: सध्याचं युग इंटरनेटचं आहे, असं अनेकजण म्हणतात. इंटरनेटमुळे आपल्या सर्वांचं आयुष्य आणखी सुखकर झाल्याचंही आपण ऐकतो. काहींनी या सोशल मीडियाचा वापर पैसे कमावण्यासाठी केल्याचंही आपण पाहतोय. अनेकजण सोशल मीडियावर विविध प्रकारचा कंटेन्ट शेअर करतात आणि नाव कमावतात. एवढंच काय तर, बक्कळ कमाईसुद्धा करतात. त्यातल्यात्यात अनेक सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म्सपैकी YouTube हे इन्फ्लुएन्सर्ससाठी कमाईचे एक मोठं साधन असल्याचं सिद्ध झालं आहे. आज कित्येकजण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात आणि त्यातून मोठी कमाई करतात. यापैकीच एक युट्यूबर अशी आहे, जिचा बॉलिवूडशी काडीमात्र संबंध नाही, ती कधीही छोट्या पडद्यावर दिसलीही नाही. पण, तरीसुद्धा तिचं नाव देशातील सर्वात श्रीमंत महिला युट्यूबर्समध्ये (YouTubers) गणलं जातं.
आम्ही ज्या युट्यूबरबाबत बोलत आहोत, ती दुसरी-तिसरी कुणी नसून सबा इब्राहिम (Saba Ibrahim) आहे. जी टेलिव्हिजन स्टार शोएब इब्राहिमची (Shoaib Ibrahim) बहीण आणि अभिनेत्री दीपिका कक्करची (Dipika Kakar) नणंद आहे. सबा इब्राहिम 'सबा का जहाँ' (Saba Ka Jahaan) नावाचं युट्यूब चॅनल (YouTube Channel) चालवते. सबा 2017 पासून युट्यूब चॅनलवर व्हीलॉग शेअर करतेय. तिचे युट्यूबवर सध्या 3.66 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सबा इब्राहिमची नेटवर्थ किती?
सबा इब्राहिमनं तिच्या यूट्यूब व्लॉग्समधून कोट्यवधींची कमाई केली आहे आणि या पैशातून तिनं अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. मुंबईत तिची एकापेक्षा जास्त घरं आहेत आणि मौदाह येथील तिच्या सासरच्या घराजवळ एक प्लॉट देखील आहे. याशिवाय, सबानं एक रेस्टॉरंट देखील उघडलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबाची एकूण संपत्ती 17 कोटी रुपये आहे आणि यासह ती भारतातील चौथी सर्वात श्रीमंत महिला युट्यूबर बनली आहे.
भारताली टॉप 5 युट्यूबर्स
- श्रुती अर्जुन आनंद : 45 कोटी
- निशा मधुलिका : 43 कोटी
- कोमल पांडे : 30 कोटी
- सबा इब्राहिम : 17 कोटी
- प्राजक्ता कोळी : 16 कोटी
सध्या गरोदर आहे सबा इब्राहिम
सबा इब्राहिमनं 2022 मध्ये खालिद नियाजशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. आणि काही महिन्यांपूर्वीच, सबानं तिची पहिली प्रेगन्सी अनाउन्स केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :