मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या मुंबई उपनगर परिसरातील निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघांचे निकाल मुंबई कोणाकडे राहणार, हे निश्चित करेल. मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांमधून (Mumbai Suburban District) एकूण 315 उमेदवार रिंगणात उतरले होते. जो पक्ष मुंबई उपनगर परिसरातील जास्तीत जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा राहतील. यादृष्टीने मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघाचा निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुंबई उपनगरात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 12, शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे यंदा काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यंदा मुंबई उपगनगरात मुख्य लढत ही ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपमध्ये असेल. महायुती आणि महाविकास आघाडीच्यादृष्टीने मुंबई उपनगरातील अनेक मतदारसंघ हे प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. बोरिवली, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मानखुर्द शिवाजीनगर आणि वांद्रे पूर्व या मतदारसंघांमध्ये काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई शहरातील 10 आणि मुंबई उपनगरातील 26 असे एकूण 36 मतदारसंघ मिळून मुंबईच्या राजकारणावर आगामी काळात कोणाचा पगडा राहणार, हे निश्चित करतील. यंदाच्या निवडणुकीतील 'बटेंगे तो कटेंगे', 'व्होट जिहाद' हे मुद्दे मुंबई शहर आणि उपनगर परिसरात कितपत प्रभावी ठरणार, हे पाहावे लागेल.
मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांतील विजयी उमेदवारांची यादी
- बोरिवली विधानसभा मतदारसंघ- संजय उपाध्याय (भाजप)
- दहिसर विधानसभा मतदारसंघ- मनीषा चौधरी (भाजप)
- मागाठाणे विधानसभा मतदारसंघ- प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
- कांदिवली विधानसभा मतदारसंघ- अतुल भातखळकर (भाजप)
- चारकोप विधानसभा मतदारसंघ- योगेश सागर (भाजप)
- मालाड विधानसभा मतदारसंघ-- अस्लम शेख (काँग्रेस)
- जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- अनंत तर (ठाकरे गट)
- दिंडोशी विधानसभा मतदारसंघ- सुनील प्रभू (ठाकरे गट)
- गोरेगाव विधानसभा मतदारसंघ- विद्या ठाकूर (भाजप)
- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ- हारुन खान (ठाकरे गट)
- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ- अमित साटम (भाजप)
- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- मुरजी पटेल (भाजप)
- मुलुंड विधानसभा मतदारसंघ- मिहीर कोटेचा (भाजप)
- विक्रोळी विधानसभा मतदारसंघ- सुनील राऊत (ठाकरे गट)
- भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ- अशोक पाटील (शिंदे गट)
- घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ- राम कदम (भाजप)
- घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ- पराग शहा(भाजप)
- मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ- अबू आझमी (समाजवादी पार्टी)
- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ- पराग अळवणी (भाजप)
- चांदिवली विधानसभा मतदारसंघ- दिलीप लांडे (शिंदे गट)
- कुर्ला विधानसभा मतदारसंघ- मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
- कलिना विधानसभा मतदारसंघ- संजय पोतनीस (ठाकरे गट)
- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
- अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ- सना मलिक ( अजित पवार गट)
- चेंबुर विधानसभा मतदारसंघ- तुकाराम काते (शिंदे गट)
Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.
आणखी वाचा