Yavatmal District Vidhan Sabha Election 2024 यवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचा मुद्दा प्रमुख आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दराचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जिल्हा म्हणून देखील यवतमाळची ओळख आहे. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड, पुसद,दिग्रस हे मतदारसंघ आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सात पैकी पाच मतदारसंघात महायुतीला यश मिळालं तर, दोन मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळताना दिसत आहेत. यवतमाळ आणि वणी मतदारसंघातून मविआचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

Continues below advertisement

यवतमाळमधील विजयी उमेदवार

आर्णी : राजू तोडसाम, भाजपदिग्रस : संजय राठोड , शिवसेनापुसद : इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसराळेगाव : अशोक ऊईके, भाजपउमरखेड : किसन वानखेडे ,भाजपवणी : संजय देरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेयवतमाळ :बाळासाहेब मांगुळकर , काँग्रेस  

Continues below advertisement

यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अनिल उर्फ बाळासाहेब मांगळुकर यांच्यापुढं भाजपच्या विद्यमान आमदार मदन येरावार यांचं आव्हान आहे.  बाळासाहेब मांगुळकर आघाडीवर असून विजयाजवळ आहेत.

राळेगाव विधानसभा मतदारसंघ (अनुसूचित जमाती)

भाजपकडून या ठिकाणी विद्यमान आमदार अशोक उईके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. काँग्रेसनं माजी मंत्री वसंत पुरके यांना उमेदवारी दिली . भाजपचे अशोक उईके विजयी झाले आहेत. 

उमरखेड विधानसभा मतदारसंघ (अनुसूजित जाती)

उमरखेड या मतदारसंघात भाजपच्या किसन वानखेडे यांची लढत  काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांच्या विरुद्ध झाली होती.  किसन वानखेडे या मतदारसंघात जिंकले आहेत.

आर्णी विधानसभा मतदारसंघ (अनुसूचित जमाती)

भाजपनं आर्णी विधानसभा मतदारसंघात राजू तोडसाम यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसच्या जितेंद्र मोघे यांचं आव्हान तोडसाम यांच्या विरुद्ध होतं. राजू तोडसाम यांनी विजय मिळवला आहे. 

वणी विधानसभा मतदारसंघ

वणी विधानसभा मतदारसंघात  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देरकर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार रिंगणात होते. वणीतून संजय देरकर विजयी झाले आहेत.

पुसद विधानसभा मतदारसंघ

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद मेंद यांना उमेदवारी देण्यात आली होती. इंद्रनील नाईक  प्रचंड मतांनी विजयी झाले.  

दिग्रस विधानसभा मतदारसंघ

दिग्रस  विधानसभा मतदारसंघाची लढत हायव्होल्टेज आहे. इथं शिवसेनेकडून संजय राठोड तर काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात होते. दिग्रसमधून संजय राठोड विजयी झाले. 

इतर बातम्या : 

यवतमाळमध्ये 2019 ला भाजप सेनेचं वर्चस्व, 2024 च्या लोकसभेला मविआची सरशी, विधानसभा निवडणुकीत काय होणार?

Ralegaon Vidhan Sabha Election : राळेगावचं मैदान कोण मारणार? अशोक उईके अन् वसंत पुरके पुन्हा आमने सामने, मतदार कुणाला संधी देणार?