Raj Thackeray On Narendra Modi Uddhav Thackeray: मराठवाड्यामध्ये स्लोगन चालायचं बाण हवा की खान...दुर्दैव असं झालं उद्धव ठाकरे यांच्याकडून बाण निघून गेला आणि आता उरले फक्त खान, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल दिंडोशी मालाड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील निशाणा साधला. आपण तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी करतो. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कवर आपण 14-15 वर्षांपासून दीपउत्सव साजरा करतो. मात्र काल अचानक सगळे लाईट बंद करुन टाकले. 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कला सभा आहे. त्यामुळे ते लाईट काढून टाकले आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

राहुल गांधी, उद्धव ठाकरे असते तर समजू शकलो असतो- राज ठाकरे

हिंदूंच्या सणावर बंदी आणली होती, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली होती. हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येत आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही दिवाळीच्या लाईट बंद करतात. राहुल गांधी असते तर समजू शकलो असतो. राहुल गांधी यांच्या डोक्यात दिवे पेटत नाही. उद्धव ठाकरे यांना लाईट कमी लागतो आणि त्याहून हिंदूंचा, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

बाळासाहेबांचे विचार कुठे आहे?, राज ठाकरेंचा सवाल

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीकडे दुर्लक्ष केल्याचे व्हिडीओ आहे तो मी पुढच्या सभेत दाखवणार आहे. बाळासाहेबांचा फोटो दाखवून मत मागत आहात पण बाळासाहेबांचे विचार कुठे आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एक नेता बाळासाहेबांचं नाव घेत नाही. उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करत आहे. बाळासाहेबांवरचं प्रेम आणि आदर याबद्दल मला कोणी शिकवू नये, असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

मोदींच्या दौऱ्याआधी छत्रपती शिवाजी पार्कचे लाईट काढले, Video:

संबंधित बातमी:

Raj Thackeray: भर सभेत फोन, पुढची सभा रद्द; भाषण सुरु असताना मंचावर नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी सर्व सांगितलं, Video