Eknath Shinde on Uddhav Thackeray  : 2022 मध्ये आम्ही जे काही केलं ते खुलेआम केलं, तसेच जनतेच्या मनातील केलं आहे. त्यामुळे त्यावेळी ते झोपले होते का? अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde on Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे यांच्यावर तोफ डागली. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कोणतीही रेस नसल्याचे त्यांनी यांनी म्हटले आहे. सरकार बहुमताने आणण्यासाठी प्राथमिकता असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.  






युज अँड थ्रो करतात हे एकनाथ शिंदे त्याचे उदाहरण


एकनाथ शिंदे म्हणाले की, सातत्याने पक्ष चोरला, पक्ष चोरला असा आरोप केला जातो. ते काही खेळणं आहे का? ते म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणतात, भाजप वापरून फेकून देते, पण ते सुद्धा तेच करतात, युज अँड थ्रो करतात हे एकनाथ शिंदे त्याचे उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली. ठाण्यामध्ये शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले की नुसते नावात दिघे असून चालत नाही. आनंद दिघे माझे गुरु होते तेव्हा केदार दिघे कधी दिसला नसल्याचे ते म्हणाले. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे, चेहरे ओळखतो, पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. 






राज ठाकरे यांच्यासोबत कम्युनिकेशन गॅप झालं


दुसरीकडे माहीममधील जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि मनसेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की हो थोडं सध्या राज ठाकरे यांच्याशी माहीमवरून कम्युनिकेशन गॅप झाला आहे. मात्र, जसा त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्ते सांभाळायचे आहे, तसे मलाही करायचं असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या