West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं द्विशतक, गाठला दोनशेचा टप्पा; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जय श्रीरामाची घोषणाबाजी

Assembly Election Result 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्के मतदान झालं आहे. तर आसाममध्ये जवळपास 86 टक्के मतदान झालं आहे. या निकालाचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर पाहू शकता.

Advertisement

एबीपी माझा ब्युरोLast Updated: 04 May 2026 11:46 PM

पार्श्वभूमी

Assembly Election Result 2026 Live Updates : देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, पुढील काही...More

ममता बॅनर्जींनाही मोठा धक्का, भवानीपूर मतदारसंघातून 15 हजार 111 मतांनी पराभव

एकीकडे भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारत तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला. त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जींनाही मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांची सत्तेसोबत आमदारकीही गेली आहे. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,111 मतांनी पराभव केला. 

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.