सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अखेर वसंतदादांचे नातू कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली.
विशाल पाटील स्वाभिमानीकडून 2 तारखेला अर्ज भरणार आहेत. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांना स्वाभिमानीकडून एबी फॉर्म देण्यात येणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. गेल्या 60 वर्षांपासून वसंतदादा पाटील घराण्याची सांगली लोकसभा मतदारसंघावर एकहाती सत्ता आहे.
सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडूनच लढणार अन्यथा अपक्ष म्हणून लढणार, असा निर्धार विशाल पाटील यांनी केला होता. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली, त्या बैठकीत विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला तिढा अखेर सुटला आहे.
सांगलीत विशाल पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारीची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2019 04:03 PM (IST)
विशाल पाटील स्वाभिमानीकडून 2 तारखेला अर्ज भरणार आहेत. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांना स्वाभिमानीकडून एबी फॉर्म देण्यात येणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -