मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले 70 उमेदवार निश्चित केल्याचं समोर येत आहे. काल पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नावं निश्चित झाल्याचं समजत आहे.

शिवसेना-भाजप युतीचीही घोषणा येत्या दोन-चार दिवसात होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा पार पडली असून पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्याबाबत बैठक पार पडणार आहे. मात्र युतीच्या फॉर्म्युल्याचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसचे पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवार

  • विश्वजित कदम (पलूस कडेगाव )
  • पृथ्वीराज चव्हाण (कऱ्हाड)
  • अशोक चव्हाण (भोकर)
  • प्रणिती शिंदे (सोलापूर)
  • अमित देशमुख (लातूर शहर )
  • बाळासाहेब थोरात (संगमनेर)
  • यशोमती ठाकूर (तिवसा)
  • नितीन राउत (नागपूर उत्तर)
  • मुजफ्फर हुसेन (मीरा भाईंदर)
  • पी.एन.पाटील (करवीर)
  • पद्माकर वळवी (शहादा)
  • शिरीष नाईक (नवापूर)
  • ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण)
  • संजय जगताप (पुरंदर)
  • रमेश बागवे (पुणे कन्टोन्मेंट)
  • कल्याण काळे (फुलंब्री)
  • अमीन पटेल (मुंबादेवी)
  • वर्षा गायकवाड (धरावी)
  • नसीम खान (चांदीवली)
  • भाई जगताप (कुलाबा)
  • कुणाल पाटील (धुळे)
  • विजय वडेट्टीवार (ब्रम्हापुरी)